Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एसबीआय लाइफचा राजस्थान रॉयल्ससह २०२३ साठी हेल्मेट पार्टनर म्हणून करार

Date:

मुंबई – एसबीआय लाइफ इन्शुरन्स या देशातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपनीने राजस्थान रॉयल्स फ्रँचाईझीशी २०२३ मधील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगसाठी हेल्मेट पार्टनर म्हणून भागिदारी केल्याचे जाहीर केले. त्यांच्या कराराचा एक भाग म्हणून २०२३ मध्ये होत असलेल्या सर्व सामन्यांदरम्यान एसबीआय लाइफचा लोगो राजस्थान रॉयल्सच्या हेल्मेटवर झळकणार आहे.

एसबीआय लाइफने राजस्थान रॉयल्स फ्रँचाईझीबरोबर केलेल्या धोरणात्मक करारातून मैदानावर हेल्मेटचे जसे महत्त्व असतेतसेच महत्त्व प्रत्यक्ष आयुष्यात जीवन विम्याला असते व त्यामुळे विमा धारकाला आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करणे शक्य होते ही बाब अधोरेखित केली जाणार आहे. क्रिकेटमध्ये हेल्मेट सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या असेट्सपैकी एक असून त्यामुळे एसबीआय लाइफला विम्याची महत्त्वाची भूमिका प्रतीकात्मक पद्धतीने मांडण्याची चांगली संधी मिळाली आहे. सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रिकेट लीग्जपैकी एकामध्ये सहभागी होण्यातून ब्रँडला आजच्या ग्राहकासह घट्ट नाते जोडणे आणि विम्याची गरज त्यांच्यापर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. 

या भागिदारीविषयी आपली उत्सुकता व्यक्त करत एसबीआय लाइफ इन्शुरन्सच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआर विभागाचे ब्रँड प्रमुख श्री. रवींद्र शर्मा म्हणाले, ‘एसबीआय लाइफ आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमी देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये ‘दिल से रॉयल’ प्रवेश घेत आहे. ही महत्त्वाची भागिदारी असून त्यातून एसबीआय लाइफ मुख्य प्रवाहातील क्रीडा भागिदारी क्षेत्रात प्रवेश करत आहे. ब्रँड या नात्याने आम्ही सातत्याने अर्थपूर्ण आणि ग्राहकासोबत जवळचे नाते प्रस्थापित करण्यासाठी मदत करू शकणाऱ्या भागिदारींच्या शोधात असतो. आजच्या माहितीचा भडीमार करणाऱ्या युगात क्रिकेट हा खेळ आणि सर्वात मोठी क्रिकेट लीग, राजस्थान रॉयलची टीम आणि हेल्मेट हे असेट निवडून आम्ही ब्रँड सिनर्जी तसेच आमच्या उद्दिष्टाचा धोरणात्मक विचार करण्यात यशस्वी झालो आहोत. या भागिदारीमुळे विमा हा सर्वांसाठी संरक्षक आणि आपली ध्येये पूर्ण करण्यासाठी मदत करणारा असल्याचे हेल्मेटसारख्या खेळाडूचे संरक्षण करणाऱ्या व कोणत्याही अडथळ्याशिवाय खेळण्याची मुभा देणाऱ्या प्रतीकाच्या माध्यमातून मांडणे आम्हाला शक्य झाले आहे. राजस्थान रॉयलच्या हेल्मेटवरील ब्रँडचे अस्तित्व लक्षवेधी आणि सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचणारे असल्यामुळे आम्हाला विम्याच्या मदतीने कशाप्रकारे संरक्षण मिळते हा संदेश देण्यास मदत होईल.’

ते पुढे म्हणाले, ‘या खेळामुळे मिळत असलेली दृश्यमानता लक्षात घेता विम्याचे महत्त्व सर्वदूर पोहोचेल २०४७ पर्यंत सर्वांसाठी विम्याचा राष्ट्रीय अजेंडा अधिक होईल अशी आशा वाटते.’

या भागिदारीविषयी राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेक लश मॅकक्रम म्हणाले, आमच्याप्रमाणेच लोकांच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल घडवून आणण्याची बांधिलकी जपणाऱ्या एसबीआय लाइफसारख्या ब्रँडसह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. रॉयल्समध्ये आम्ही कायमच खेळाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या ताकदीवर विश्वास ठेवला आहे आणि ही भागिदारी त्या विश्वासाची पावती देणारी आहे. विम्याचा प्रसार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी तसेच चाहते व एकंदर समाजासाठी अर्थपूर्ण संधी तयार कण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

एसबीआय लाइफमध्ये आम्ही विमा योजनांच्या माध्यमातून समाजात बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, कारण त्यामुळे विमाधारकाला त्याच्या प्रियजनांच्या गरजा व महत्त्वाकांक्षाची काळजी घेऊन आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करता येतो. एसबीआय लाइफच्या सर्वसमावेशक जीवन विमा उत्पादनांची श्रेणी दीर्घकालीन संरक्षणबचत आणि गुंतवणुकीच्या संधी देण्याच्या हेतूने तयार करण्यात आली असून त्यामुळे ग्राहकांना शांत मन आणि संपूर्ण आत्मविश्वासासह आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करणे शक्य होते. राजस्थान रॉयलसह केलेली ही भागिदारी क्रिकेटच्या माध्यमातून समाजात आमूलाग्र बदल घडवण्यात आणि संरक्षणावर भर दिल्यास आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी निश्चिंती मिळत असल्याची भावना समाजात रूजवण्यास मोठे योगदान देईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...