फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी व्हिगन पर्याय, लॉरेंट- पेरियर शॅम्पेन आणि वाइन्सची आकर्षक श्रेणी
केबिन क्लाससाठी गॉर्मे मील्स, ट्रेंडी अपेटायझर्स आणि आकर्षक डेझर्ट्स
नवी दिल्ली – एयर इंडियाने ग्राहकांना अधिक आनंद मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या (एक्स- इंडिया) सर्व केबिन्समधील इनफ्लाइट खाद्यपदार्थ व पेये यांचा समावेश असलेला मेन्यू अद्ययावत केला आहे.
प्रवाशांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या मदतीने हा मेनू नव्याने तयार करण्यात आला असून त्यात गॉर्मे मील्स, ट्रेंडी अपेटायझर्स, रूचकर डेझर्ट्स तसेच आरोग्यदायी खाण्याचा ट्रेंड लक्षात घेऊन भारतातील स्थानिक पदार्थांचा प्रभाव दर्शवणारे खाद्यपदार्थ समाविष्ट करम्यात आला आहे. एयरलाइनच्या बार मेन्यूमध्ये आता प्रीमियर ब्रँड्सच्या स्पिरीट्सचा समावेश करण्यात आला असून उत्तमोत्तम फ्रेंच आणि इटालियन वाइन्सचा समावेश असलेली वाइन लिस्ट तयार करण्यात आली आहे.
एयर इंडियाच्या इनफ्लाइट सेवा विभागाचे प्रमुख संदीप वर्मा म्हणाले, ‘प्रवाशांचा एयर इंडियाचा अनुभव उंचावण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही नव्या मेन्यूमध्ये नवा विचार व उर्जा आणली आहे. प्रवाशांनी एयर इंडियाच्या ऑन बोर्ड विमानसेवेतील खाद्यपदार्थ व पेयांचा एखाद्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये असल्याप्रमाणे आनंदाने आस्वाद घ्यावा असे आम्हाला वाटते.’
‘नवा मेनू तयार करताना आम्ही त्यात पौष्टिक आणि रूचकर तसेच आधुनिक व शाश्वत पद्धतींचा वापर करून बनवलेले खाद्यपदार्थ समाविष्ट करण्यावर भर दिला आहे.’
एयर इंडियात खानपानाचा दर्जेदार अनुभव देण्यासाठी इन- हाउस तज्ज्ञ, केटरिंग भागीदार व विविध पुरवठादारांची टीम एकत्र आणली गेली.
व्हिगन खाद्यपदार्थांचा विचारपूर्वक समावेश – एयर इंडियाच्या फर्स्ट आणि बिझनेस क्लास ग्राहकांपैकी जे व्हिगन जीवनशैलीचा अवलंब करतात त्यांच्यासाठी वनस्पतीजन्य पदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला असून त्यात सब्ज सीख कबाब, थाई रेड करी विथ टोफू अँड व्हेजिटेबल्स, ब्रोकोली अँड मिलेट स्टेक, लेमन सेवया उपमा, मेदू वडा आणि मसाला उत्तपम यांचा समावेश आहे.
मुख्य आणि हलक्या जेवणासाठी नवी प्रेरणा – सर्व क्लासमधील सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्यासाठी फ्युजन व अभिजात खाद्यपदार्थांचा मेळ घालण्यात आला आहे. त्यात मशरूम स्क्रॅम्ब्ल्ड एग, टर्मरिक चिली ऑम्लेट, मिक्स्ड व्हेजीटेबल पराठा, अचारी पनीर आणि इमेंथल सँडविच इन मल्टीग्रेन ब्रेड, ग्रिल्ड प्रॉन्स न ए फेनेल क्रीम सॉस, बेक्ड फिलेट फिश विथ अ हर्ब आलमंड अँड गार्लिक क्रस्ट, मसाला दाल अँड ब्राउन राइस खिचडी विथ स्प्राउट्स, रोस्ट टोमॅटो अँड बोकोसिनी कप्रेसे विथ कालामाटा ऑलिव्ह्ज अँड पेस्टो, क्लासिक टोमॅटो अँड कोरिएंटर शोरबा विथ क्रिस्प नमकपारा यांचा समावेश असेल.
गोड पदार्थ : एयर इंडियाच्या प्रवाशांना एकापेक्षा एक सरस डेझर्ट्सचाही आस्वाद घेता येईल. त्यामध्ये मँगो पॅशनफ्रुट डिलाइट, क्विनोआ ऑरेंज खीर, एसप्रेसो आलमंड क्रम्बल मूस केक, खजूर तुकजा, केसर फिरनी, सिंगल ओरिजिन चॉकलेट स्लाइस, चम-चम सँडविच विथ ब्लूबेरी सॉस आणि हंगामी फळे यांचा समावेश असेल.
बार मेन्यू: ग्राहकांना एयर इंडियाच्या विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या बार मेन्यूमध्ये फाइन वाइन्स उपलब्ध होणार असून त्यात लॉरेंट- पेरियर ला कुवे ब्रुट शॅम्पेन, उत्तर इटलीच्या प्रसिद्ध वाइनयार्ड्स शॅटो दे ल‘हेस्ट्रेंज, लेस ऑलिव्हियर्स, चॅटौ मिलॉनच्या वाइन्स यांचा समावेश असेल. त्याशिवाय नव्या मेन्यूमध्ये विविध प्रकारच्या व्हिस्की, जिन, व्होडका आणि प्रीमियम ब्रँड्सच्या बीयर्सही समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
आदर्श जोडी – फळांच्या स्वादांपासून सुगंधी मसाल्यांची चव असलेली मॉकटेल्स एयर इंडियाच्या सिलेक्शनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात व्हर्जिन मेरी, कॅलिफोर्निया ऑरेंज, अपल स्पित्जर आणि विविध ज्युसेसचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे फाइन डाइनचा अनुभव आणखी उंचावण्यास मदत होईल. गरम पेयांची आवड असलेल्यांसाठी ताजी कॉफी (क्लासिक कॉफी ब्लेंड व कॅपॅचिनो) किंवा चहा (आसाम, अर्ल ग्रे आणि मसाला) उपलब्ध करण्यात येईल.

