पुणे- भाजप सेना युती झाली तर पूर्व भागातील अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आणि अनेकांनी आमदारकी साठी गुढग्याला बाशिंगे बांधली ,पण युती हि तूर्तास तरी लोकसभेसाठी झालेली आहे ,असे सांगत आपण केलेल्या विविध विकास कामांची जंत्री वाचून दाखवीत भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी १५ वर्षात कोणी केली नाही एवढी कामे आपणा आपल्या मतदार संघात सुरु केलीत असा दावा काल येथे केला .
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४१ मधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक गोपाळराव चिंतल यांच्या हस्ते करण्यात आले . याचवेळी सुखसागरनगर सर्वे नंबर 19 मधील मुलांसाठी खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन,कात्रज-कोंढवा रोड ते गंगोत्री हॉटेल या रस्त्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले .
टिळेकर म्हणाले ,१५ वर्षात कोणी केली नाही एवढी कामे आपणा आपल्या मतदार संघात सुरु केलीत , कात्रज कोंढवा रस्ता होणार नाही अशी स्थिती असताना त्याच्या कामाला आपण प्रारंभ केला ,24 तास पाणी पुरवठा यंत्रणा आता पुढील एक वर्षात सुरु होईल .विरोधकांचा समाचार आपल्या भाषणातून घेताना त्यांनी ,आता त्यांना इथे कामच उरले नाही ,एकच काम उरले आहे ,योगेश टिळेकर कोठे कोणत्या गाडीने जातो,काय खातो यावरच त्यांचे लक्ष आहे , कार्यकर्त्यांची कामे करत असताना आपल्यावर खंडणीचा गुन्हा दाखला झाला . पण कार्यकर्त्यांसाठी आपण असे हजारो गुन्हे अंगावर घेवू असेही ते म्हणाले .
या भागातील ,मतदार संघातील नागरिक आपल्याला घरातल्यांसारखेच आहेत असे सांगणाऱ्या टिळेकरांना अखेरीस आपल्या पित्याच्या आठवणीने रडू कोसळले …पहा आणि ऐका नेमके योगेश टिळेकर यांनी काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात आहे तसे …