आरोग्य तपासणी शिबीरात ३५० जणांचा सहभाग

Date:

पुणे – शिवाजीनगर मतदारसंघ, बोपोडी येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज (गुरुवारी) आयोजित करण्यात आले होते. त्यात ३५० जणांनी सहभाग घेतला, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

या शिबीरासाठी भारती हॉस्पिटल आणि एच.व्ही.देसाई हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. शिबीरात कर्करोग (सर्जरी मोफत), हृदय रोग (एंजिओप्लास्टी, बायपास मोफत), हार्निया, जनरल तपासणी, मोफत डायलिसिस, साधारण प्रसुती – सिझेरीन प्रसुती (अल्प दरात), आहार तज्ज्ञांचा मोफत सल्ला, मानसोपचार मोफत सल्ला, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सवलतीच्या दरात चष्मे वाटप, मुतखडा, मूळव्याध, ॲपेंडिक्स, त्वचारोग याच्या तपासण्या करण्यात आल्या, मोफत औषधे देण्यात आली.

शिबीरात जे, जे नागरिक सहभागी झाले त्यांच्यावर मोफत उपचार होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार शिरोळे यांनी शिबीराच्या उदघाटनप्रसंगी बोलताना दिली. यापुढेही शासकीय योजना राबविल्या जातील आणि आरोग्य शिबीरे आयोजित केली जातील, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

याप्रसंगी सर्वश्री दत्ताभाऊ खाडे, प्रकाश ढोरे, रविंद्र साळेगावकर, दत्तात्रेय गायकवाड, आनंद छाजेड, सुनील माने, गणेश बगाडे, मुकेश गवळी, शैलेश बडदे, प्रकाश सोलंकी, दलजितसिंग रँक, धर्मेश शहा, बाळासाहेब दारवटकर, रोहित भिसे, संकेत कांबळे, सागर मदने, सुप्रिम चोंधे, नीलेश रेणुसे, जय जोशी तसेच शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मनःशांती- विश्वशांतीसाठी भारतीय योग व सूर्यनमस्कार दिशादर्शक

पोलंडचे तज्ञ डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांचे विचारविश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ...

समतेचा विचार घराघरात पोहोचवूया! मंत्री चंद्रकांतदादा पाटलांचा संकल्प

पुणे: सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या...

अश्व क्षेत्राला मिळेल उभारी,राज्य सरकार संस्थाशी करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

इक्वाइन कलेक्टिव्ह आयोजित द इक्वेस्ट्रियन राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पुणे, ११...