पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाची रचना नागरी प्रशासन, वाहतूक विभाग आणि लोकांचे गट यांच्या गरजा लक्षात घेऊन केली जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
प्रस्तावित उड्डाणपुलाच्या रचनेचा आढावा घेण्यासाठी पीएमआरडीएचे उपायुक्त सुहास दिवसे, महानगर नियोजक विवेक खरवडकर यांच्यासह पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. पुलाच्या संरचनेची दीर्ध मुदतीची उपयोगिता, सुलभ वाहतूक व्यवस्थापन आणि पादचारी सुरक्षा यावर चर्चेत भर दिला, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

