पुणे-
एक नोव्हेंबरपासून पुणे शहरातील उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका आणि हिरवाई उद्यानातील स्वच्छता विषयक कामांची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज, शुक्रवारी पाहणी केली.

या संदर्भात आ. सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हटले आहेकी,’ कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गेल्या ८ महिन्यांपासून बंद असलेले पुणे शहरातील ८१ उद्याने नागरिकांसाठी १ नोव्हेंबर २०२० पासून सुरु करण्यास पुणे महापालिकेने परवानगी दिलेली आहे.या पार्श्वभूमीवर आज मी शिवाजीनगर मतदारसंघातील मॉडेल कॉलनी येथील चित्तरंजन वाटिका उद्यान व भांडारकर रोड येथील हिरवाई उद्यान याठिकाणी पुणे मनपाचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांबरोबर जाऊन पाहणी केली.१ नोव्हेंबर पासून उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागणार नाही व त्यांना उद्यानामध्ये कोणताही त्रास होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येऊन उद्याने सज्ज करण्यास सांगितले आहे.उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे कि, पुणे मनपाने दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे जेणेकरून आपण कोविड चा होणारा फैलाव रोखू शकतो. आपले लाडके पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे “जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं” याप्रमाणे आपल्या सर्वाना काळजी घ्यावी लागणार आहे. असेही शिरोळे यांनी म्हटले आहे.

यावेळी पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर, सरचिटणीस प्रतुल जागडे, सरचिटणीस गणेश बगाडे, चिटणीस जय जोशी, निलेश धोत्रे व उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

