आमदार शरद रणपिसे यांचं निधन

Date:

पुणे : काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे गुरुवारी दुपारी३ वाजता ह्रदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना पंधरा दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठे बंधू राजू तसेच अन्य परिवार आहे. स्वतः शरद रणपिसे अविवाहीत होते.पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी म्हणून पुण्यातील बहुतांश पदाधिकारी मुंबईत आहेत. शहराध्यक्ष रमेश.बागवे, माजी आमदार मोहन जोशी,आबा बागुल ,अँड अभय छाजेड हे सर्वजण मुंबईत असताना आज त्यांचे निधन झाले . त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच अविनाश बागवे, अजित दरेकर, हेमंत बागुल,रमेश अय्यर आदींनी जोशी हॉस्पिटलकडे धाव घेतली .आणि त्यांच्या निधनाचे वृत्त समजले

बॅॅरीस्टर गाडगीळ,प्रकाश ढेरे, सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वा समवेत काम करत १९७९ साली ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर १९८५ ते १९९५ पर्यंत  पर्वती विधानसभा मतदार संघातून ते दोन वेळा आमदार झाले व तीन वेळा विधानपरिषदेचे सदस्य होते. सध्या ते काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते होते. अतीशय मनमिळावू आणि अभ्यासू नेते म्हणून रणपिसे सर्व पक्षात परिचित होते. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ते ओळखले जात. पुण्यात काँग्रेसची राजकीय स्थिती अवघड होत असतानाही पक्षाच्या जून्या कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी नेटाने टिकवून ठेवली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत त्यांनी विविध पदावर तीन दशके काम केले. आपल्याला दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे त्यांनी पार पाडली.

प्रतिभा पाटील यांच्याबरोबर रणपिसे यांचा स्नेह

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याबरोबर रणपिसे यांचा स्नेह होता. पुण्यातच स्थायिक असलेल्या पाटील यांंनी बुधवारी दुपारी रूग्णालयात येऊन रणपिसे यांची भेट घेतली. शरद माझा धाकटा भाऊ आहे त्याला लवकर बरे करा असे डॉक्टरांंना सांगत पाटील यांनी रूग्णालयात अर्धातास रणपिसे यांच्यासमवेत व्यतीत केला असे नगरसेवक अविनाश साळवे यांनी सांगितले.

शिवरकर -रणपिसे यांची जोडी ख्यातनाम

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व रणपिसे यांची महाविद्यालयीन वयापासून घनिष्ट मैत्री होती. दोघेही काँग्रेसचे काम करत. त्यांना पदेही मिळाली. फुले आंबेडकर अशीच त्यांची ओळख काँग्रेसमध्ये त्या काळात होती. अतिशय जवळचा मित्र मी गमावला, हे दु:ख शब्दात व्यक्त करणे अवघड आहे अशी भावना शिवरकर यांनी व्यक्त केली. उद्या 11 वाजता कोरेगावपार्क स्मशान भूमी येथे,शरद रणपिसे त्यांच्या पार्थिवा वर अंत्यसंस्कार होणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...