पुणे – – देशभक्तीपर संगीताच्या तालावर तरुण -तरुणीचा जल्लोष करणारे नृत्य … मुलीचे संगोपन करणारे आम्ही मायकेकीचा संदेश देणारे फलक … हम सब एकच संदेश देणारा आणि स्वच्छतेचे महत्व सांगणारे चित्ररथ … एन .. सी . सी कॅडेटचा उत्साहवर्धक सहभागाने प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात काल शुक्रवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेचे कॅम्प परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत तर केलेच . त्याचबरोबर भारत माता कि जयच्या जयघोष करत तेही या शोभायात्रेत सहभागी झाले. संपूर्ण कॅम्प परिसर काल देशभक्तीने भारावून गेला होता .
केअर टेकर्स सोसायटी व लष्कर भागातील मंडळातर्फे काल शुक्रवारी भव्य शोभायात्रा पुणे कॅन्टोन्मेंट भागात काढली . गोळीबार मैदाना पासून काल सकाळी १० वाजता शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा न्यू मोदीखाना चौक,सेंटर स्ट्रीट, खाणे मारुती देवस्थान , बाबाजन चौक , भोपळे चौक मार्गाने महात्मा गांधी रस्त्याने आली. या शोभायात्रेचा समारोप हॉटेल अरोरा जवळील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ झाला.

शोभायात्रेच्या अग्रभागी न्यू सुयोग म्युजिकल बँड चे पथक देशभक्तीपर गीताची धून वाजवत निघाले होते. त्यापाठोपाठ कॅम्प एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे एन . सी .सी . चे कॅडेटचे पथक सहभागी झाले होते. यानंतर केअर टेकर्स सोसायटी संस्थेचा सर्व धर्म समभाव चा संदेश देणारा चित्ररथ होता . या रथात विविध धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे वेशभूषेतील विधार्थी हम सब एक चा संदेश देत होते. याच चित्ररथात भारताच्या संविधानचे महत्व समजावून सांगणारा फलक होता . त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्वच्छतेचे महत्व सांगणारा चित्ररथ सहभागी झाला होता . यानंतर सरगम बँडचे पथक आणि देशभक्तीपर संगीताच्या तालावर नृत्य करत तरुण -तरुणी सहभागी झाले होते.या शोभायात्रेत भारतमाता कि जयचा जयघोष निनादत होता. त्याचबरोबर मुलीचे महत्व समजावून सांगणारे- मुलगी ओझं नाही … आधार आहे , आम्हाला मुलगी आहे याचा आम्हाला अभिमान आहे . मुलीला शिकवून मोठे करायचे आहे असे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या .
या शोभायात्रेत केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , सदस्य दिलीप गिरमकर , प्रशांत यादव , नितीन पंडित , रणजित परदेशी, रवींद्रनाथ सल्ले, दत्ता दरपेल्ली , बाळसुंदर ठुबे , पवन देडगावकर , अमोल भोसले ,श्रीमती छबूआक्का जाधव , कपिल कल्याणी , विशाल कामठे , श्याभि मंडोसा , सौ . तृप्ती सबनीस , कुमारी मिनल खरात , सौ . मेघना कल्याणी , सौ . प्रियांका शिंदे , सौ . शिला खेमकर ,सौ मंजुषा देडगावकर यांच्यासहित विविध मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .

