खडकमाळ आळी तहसीलदार कचेरी समोर वकिलांचे आंदोलन
पुणे- पुणे येथील तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन च्या वतीने तहसीलदार कार्यालयात कामं करणार्या वकीलांना अचानक पणे वकीलांचे टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई केल्यानंतर पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड मिलींद द पवार यांच्या नेतृत्वाखाली खाली शुक्रवार पेठ येथील खडकमाळ अळी येथील तहसीलदार कचेरीच्या प्रवेश द्वारापाशी घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन ही पुणे बार असोसिएशनशी सलग्न बार असोसिएशन आहे. तहसीलदार कचेरीतील एका कर्मचार्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार नुकतीच कारवाई होऊन संबंधीत कर्मचारी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडला होता व त्याला अटक झाली होती. त्या प्रकरणानंतर चिडून जाऊन जाणिव पुर्वक तहसीलदार कचेरीत नियमित पणे काम करणाऱ्या वकीलांना तहसीलदार कचेरीतुन बळजबरीने बाहेर काढण्यात आले.
तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन च्या वतीने तहसीलदार हवेली पुणे यांना निवेदन देण्यात आले व आमच्या जागा आम्हाला पुर्ववत द्याव्यात व तहसीलदार कचेरीत कायदेशीर काम व वकीली व्यवसाय करायला अडथळा आणू नये तसे केल्यास भविष्यात तिव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन च्या वतीने देण्यात आला.
झालेल्या आंदोलनात पुणे बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष अॅड मिलींद द पवार, तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन च्या अध्यक्षा अॅड राजश्री रा.अडसुळ/जाधव, उपाध्यक्ष अॅड मच्छींद्र नागपूरे, सचिव महेश सकट, सह-सचीव अॅड अनिता ठाकुर, अॅड लक्ष्मण कांंबळे, अॅड मुरलीधर तावरे, अॅड चक्रधर काळे, अॅड सुभाष ओसवाल,अॅड शमा शिंदे,अॅड अनिल पाटील, पुणे बार असोसिएशन चे माजी सचिव अॅड सचीन हिंगणेकर आदी उपस्थित होते.