पुणे- राज्यघटना बदलणारच असे वक्तव्य करणारे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांचा निषेध पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात विविध पक्ष , संघटना व संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते . या आंदोलनात आमदार ऍड जयदेवराव गायकवाड , एल. डी. भोसले , डॉ. संजय दाभाडे , विजय जाधव , अशोक राठी ,पंडित कांबळे , नगरसेवक प्रदीप गायकवाड , गोविंद पवार , राहुल तायडे , मयूर गायकवाड , मनाली भिलारे , शिवाजी गायकवाड , मोहन कांबळे , तुकाराम शिंदे , नितीन रोकडे , गणेश आल्हाट , प्रतीक कांबळे , जनार्दन जगताप , अक्षता राजगुरू , गितांजली हेंद्रे , सुरेश चेंडके , किरण शिंदे , सिध्दार्थ गायकवाड , कुमोद गायकवाड , केतन गायकवाड , मन्नू कागडा , अतिश वाघमारे , आनंद हिरवे , विकी कांबळे , प्रवीण डाळिंबे , अभिषेक बोके , रविकांत वर्पे , गंगाराम आल्हाट ,भोलासिंग अरोरा , रंगाशेठ , सुजित यादव , गणेश लांडगे , संग्राम होनराव पाटील , संतोष गायकवाड मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .
‘स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना त्यांचे आई-बाप कोण हे देखील ठाऊक नस’ असे वादग्रस्त वक्तव्य करतानाच;आम्ही संविधान बदलायलाच सत्तेत आलोय,असं विधानही केंद्रीय रोजगार आणि कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केल्याचा आरोप करीत त्यांच्या या विधानाचा आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांनी संताप व्यक्त करून या वक्तव्याचा निषेध नोंदविला.
कोप्पल जिल्ह्यातील यलबुर्गा येथे झालेल्या ब्राह्मण युवा परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. राज्यघटनेविरुद घटना निर्मितीपासूनच हिंदुत्ववादी पक्ष संघटनाचा विरोध होता . या देशाची संस्कृती व हिंदू धर्माला या घटनेत काहीच स्थान नाही म्हणून आम्ही एक दिवस हि घटना बदल्याशिवाय राहणार नाही , अशी त्यावेळी हिंदू महासभा , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती व तशी अनेकदा त्यांची वक्तव्ये केली होती . दोन वर्षांपूर्वी सर संघ चालक मोहन भागवत यांनी देखील राज्यघटनेच्या बदलण्याची गरज आहे . अशा अर्थाचे वक्तव्य भाजपा एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राज्य घटनेबाबत उदो उदो करतात प्रत्यक्षात घटना बदल हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे . म्हणूनच हेगडे प्रवृत्ती अशी वक्तव्य करीत आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो . असे ऍड जयदेवराव गायकवाड यांनी सांगितले .