पुणे-ख्रिसमसनिमित्त सालोम ख्रिश्चन असोसिएशनतर्फे कॅरोल सिंगिंग फेस्टिवल घेण्यात आला . वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी यांनी केले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पुणे बिशप प्रमुख थॉमस डाबरे , पीटर डिक्रूज , अँजलिस अँथोनी , सायमन अँथोनी , रिबेलो जेकब , मुनावर सिंग , संदीप मंजुळकर , जेरी राजमनी आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीटर डिक्रूज यांनी केले .
या कॅरोल सिंगिंग फेस्टिवलमध्ये परीक्षकाचे काम पास्टर अण्णासाहेब पवार , जीनिफेर लोबो , साहिल शेकटकर , ब्रदर अखिल यांनी केले . या फेस्टिवलमध्ये घोरपडी गावमधील सेंट जोसेफ चर्च , कोंढवा खुर्दमधील न्यू लाईफ वर्शीप चर्च , शिवनेरीनगरमधील आ लेडी ऑफ लुडस चर्च विजेते ठरले . तर स्पेशल पदकाचे मानकरी डेनला लोबो , साहिल शेकटकर व बेनी वूड्स तर सिल्वर बेल्टचे मानकरी ट्रेव्हर मार्टिन विजेते ठरले . ता फेस्टिवलमध्ये सात चर्चमधील १५० मुलांनी सहभाग घेतला .