काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासासाठी निघालेल्या कु.सायली महाराव व कु.पूजा बुधावले यांचा पुण्यात सन्मान
पुणे-बेटी बचाव-बेटी पढाव व प्रदूषण मुक्त भारत हा संदेश देण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल प्रवासावर निघालेल्या कु.सायली महाराव(ठाणे)व कु.पूजा बुधावले(पुणे)यांचे आज 2000 की.मी.प्रवास करून पुणे शहरात आगमन झाले असता त्यांना पुढील प्रवासाकरीता शुभेच्छा देण्यासाठी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड़, गजानन सोनावणे,प्रशांत गांधी,विकास भांबुरे, गोपाळ भंड़ारी,अनिकेत बोकील,अजित कोलेकर,राहुल कोटला विजय राजमाने, शाबीर खान, सोनू शेख,बबलू सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन्ही मुलींनी “बेटी बचाव-बेटी पढाव व प्रदूषणमुक्त भारत”हा संदेश काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास करून आपल्या कृतीतून देत आहेत त्याबद्दल त्या कौतुकास पात्र आहेत असे मत यावेळी श्री.बांगड़ व श्री.भांबुरे यांनी व्यक्त केले व त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
दोन्ही मुली महाविद्यालयीन शिक्षण घेत असून त्यांना या प्रवासासाठी के टू के राईड़चे गोपाळ भंड़ारी व अनिकेत बोकील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.