पुणे-संविधान दिनानिमित्त मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड (ताडीवाला रोड) येथील पंचशील चौकात मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने सजनाबाई भंडारी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नगरसेवक प्रदीप गायकवाड सचिन शिंदे, सुमन गायकवाड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच , संविधानाचे पूजन नगरसेविका लता राजगुरू , सोनूभाऊ निकाळजे , शाम गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी संविधानाच्या उद्देशकीचे वाचन बौद्धाचार्य जयसिंग कांबळे व सजनाबाई भंडारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी. दाहिंजे यांनी केले .
या कार्यक्रमाचे संयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष राहुलदादा तायडे , दलित पँथर नेते प्रकाश साळवे , सुजित यादव यांनी केले . यावेळी प्रा. मयूर गायकवाड , यासिन शेख , श्रीराम चौधरी , केशव शिंदे , नितीन रोकडे , धनंजय कांबळे , के. बी. मोटघरे , बी. आर. थोरात , रामचंद्र वंजारे , बंडू गायकवाड , जितेंद्र गायकवाड , नवनाथ सोनकांबळे , नामदेव बनसोडे , कैलास झेंडे , कुंदन रणधीर , गौतम कांबळे , विनोद उबाळे , शशी निकाळजे , निलेश गायकवाड, गौतम सवाणे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी सजनाबाई भंडारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी. दाहिंजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान यांनी या देशातील वेगवेगळ्या जातींना एकत्र ठेवून या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम केले आहे . या संविधानामुळे सर्वाना शिक्षणाचा हक्क, समान कायदा व मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे . हे संविधानाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व कटिबध्द राहू , अशी शपथ घेण्यात आली . भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

