पुणे-श्री. संत सावता माळी युवक संघाच्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विष्णु राजाराम बनकर हे ‘संत सावता भूषण पुरस्कार-२०१७ ने सन्मानित करण्यात आले .
या पुरस्कार सोहळ्यास संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज हभप रमेश महाराज वसेकर, अडव्होकेट धनंजय जाधव , श्री. संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनिल गुलदगड आदि मान्यवर उपस्थित होते .
विष्णु राजाराम बनकर हे बजाज ऑटो लि. चाकण, पुणे या जागतिक दर्जाच्या दुचाकी निर्माण करणार्या कारखान्यात काम करीत आहे . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना ‘संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य’ आयोजित ‘संत सावता भूषण पुरस्कार- २०१७’ ने सन्मानित करण्यात आले .
शिक्षण घेत असताना वर्गप्रतिनिधी, कवायत, प्रभातफेरी, स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, गणेशोत्सव, शिक्षकदिन, अभियंता दिन, कामगार दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान, सर्व शिक्षा मोहीम, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अंताक्षरी, इत्यादी उपक्रमांमध्ये वैयक्तिक व सांघिक कार्ये केलेली आहेत. तसेच ‘कलागंध’, क्रीडासप्ताह, आनंदमेळावा, हौजी, विज्ञान प्रदर्शन, नियतकालिका प्रकाशन, वसतिगृह स्वच्छता मोहीम, इत्यादी उपक्रम राबविले.नियतकालिकांमध्ये लेख, चारोळ्या, विनोद आदि साहित्य प्रकाशित झाले.
विष्णु बनकर याना केटीएम् नॉर्थ अमेरिका या कंपनांचे अध्यक्ष आदरणीय जॉन इरिक बुर्लिसन सर यांचेकडून अमेरिका अभ्यास दौर्यासाठी दोन वेळा आमंत्रण असून अपंग तसेच पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतकार्य, महिला मेळावा, वृक्षारोपण, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमामध्ये फळेवाटप, रक्तदान, नैसर्गिक आपत्ती मदतनिधी, स्वच्छ भारत अभियान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या निषेध, न्यायहक्कांसाठी संघटन, आंदोलने, मोर्चे, इत्यादि कार्ये केलेली आहेत . विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून सातत्याने ज्ञान घ्यावे यासाठी प्रयत्नशील असतात. शारीरिक व मानसिक ताण-तणावातून मुक्ती व्हावी यासाठी ‘योगा’ तसेच ‘ए.एम्.आय्.ई’ या अभियांत्रिकीच्या पदवीचे ‘विनामूल्य’ मार्गदर्शनकरतात . पर्यावरण रक्षण, व्यायाम व आर्थिक बचत डोळ्यासमोर ठेवून, आजही घाम पुसत सायकलीवर वैयक्तिक व शैक्षणिक कामे करून समाजाला पर्यावरण रक्षणाचा संदेश देतात.