पुणे-सकल मराठा समाज पूर्व विभाग पुणे शहरच्यावतीने स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता . मंगळवार पेठमधील सिध्देश्वर मंदिरमध्ये झालेल्या या स्नेहमेळाव्यामध्ये पुणे शहरामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारणी , क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक उभारणी , पुणे महानगरपालिकेच्या बारा व पंधरा नंबर शाळामध्ये नामफलक बसविणे तसेच , १९ फेब्रुवारी शिवजयंती लाल महल या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्याचे ठराव समाजाच्यावतीने करण्यात आले .
या स्नेहमेळाव्यास प्रमुख पाहुणे मराठा समाजाचे नेते शांताराम कुंजीर , सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रफुल्ल गुजर , माजी नगरसेवक बाळा शेडगे , माजी उपमहापौर अरविंद पारगे , माधवराव बारणे , विठ्ठलराव खोपडे , शंकर शिवले , सुनील बारणे , अनिल ताडगे , नाना निवंगुणे , राजश्री सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते .
या स्नेहमेळाव्याचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मराठा समाजाचे नेते शांताराम कुंजीर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . यावेळी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्ज माफीवर शेतकरी आक्रोश कृती समितीने सुरु केलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव येथील आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला . समाजातील तरुण पिढी एकत्र करून त्यांच्यामधून उद्योजक निर्माण करणे , उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे , स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त मुलांना प्रोत्साहन देणे , समाजातील महिलांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा याकरिता प्रयत्न करणे , तसेच बाजारपेठ उपलब्ध करणे
या स्नेह मेळाव्याचे आयोजन सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रफुल्ल गुजर यांनी केले होते . या स्नेह मेळाव्याचे संयोजन करण्यासाठी मुकेश यादव , राजन तौर ,अमोल मांढरे , किशोर मोरे , संतोष जाधव , दादा वाडकर , आरती मोरे व उमा शेडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले .