pune-लहुजी महासंघ पर्वती विधानसभा मतदारसंघाच्यावतीने, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्यां २२३ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते . पर्वतीमधील सहयाद्री मैदानावर कार्यक्रमाला स्वारगेट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार , नगरसेविका सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते , नगरसेवक धीरज घाटे, योगेश समेळ , लहुजी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वैराळ, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे , लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे , लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचे स्वागताध्यक्ष सुनीलभाऊ खंडाळे , मनोज तोरडमल, गणेश क्षीरसागर, मा. राजाभाऊ शेळके , सचिन जोगदंड , स्वाभिमान संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुधीर आण्णा शिंदे , श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत क्षीरसागर ,अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेचे सचिव निखिल मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन लहुजी महासंघाचे पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष मंगेश जाधव, संदीप दसवडकर , बाळासाहेब मोहिते , मालती अवघडे , अश्विन दोडके , अरविंद वाघमारे , राजू चांदणे , अतिश कापसे , सुमित अडागळे , संतोष सरोदे , गणेश लांडगे आदींनी केले .
या रक्तदान शिबिरासाठी के. इ. एम. रुग्णालयाच्या रक्तपेढीने विशेष सहकार्य केले .रक्तपेढीचे प्रमुख डॉ. किशोर धुमाळ यांनी विशेष सहकार्य केले . रक्तदान करणाऱ्याना वृक्ष , प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला .