पुणे–
गुरुनानक जयंतीनिमित्त पुणे लष्कर भागातील गुरुद्वारा गुरुनानक दरबारममध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली . गुरुद्वारामध्ये शीख व सिंधी बांधवानी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती . गुरुद्वारामध्ये कीर्तन , लंगर , भजनाचे गायन सुरु होते . या उत्सवामध्ये शीख व सिंधी बांधवांसह इतर धर्माचे नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात . यंदाच्या वर्षी अमृतसर येथील प्रमुख कीर्तनकार रायसिंग व काश्मीरमधील बारामुल्लायेथील अरविंदरपालसिंग व दिल्ली येथील चरणसिंग सुखिया यांचे कीर्तन झाले . तसेच गेले दोन दिवसापासून अखंड पाठ सुरु होते , त्याचा समारोप आज सकाळी झाला .
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , बिल्डिंग कमिटी चेअररमन संतसिंग मोखा ,गुरुद्वाराचे माजी अध्यक्ष हरमिंदरसिंग घई, उपाध्यक्ष करमजितसिंग आनंद , उपाध्यक्ष आर. पी. एस. सहेगल , सरचिटणीस बलविंदरसिंग ऑबेरॉय , चिटणीस दलजितसिंग रॅन्क , सहचिटणीस कुलजितसिंग चौधरी , जनसपंर्क अधिकारी मोहिंदरसिंग कंधारी ,लंगर व्यवस्थापक इंद्रजितसिंग सहानी आदी मान्यवर उपस्थित होते .
गुरुद्वारास मनजितसिंग विरदी , इकबाल शेख , संदीप खर्डेकर , दिलीप उंबरकर , सतीश गायकवाड , नदीम मुजावर , रिझवान सय्यद आवडीने भेटी दिल्या . यावेळी गुरुद्वाराचं आवारात वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये रोटरी क्लब ऑफ पुनाच्यावतीने सहाशे जणांची संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी आरोग्य तपासणी करण्यात आले . या शिबिराचे आयोजनरोटरी क्लब ऑफ पुनाचे नरेंदरपालसिंग बक्षी यांनी विशेष परिश्रम घेतले . तर पूना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले . यामध्ये २०० पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले . या रक्तदान शिबिरासाठी पूना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे डॉ. इंद्रमोहनसिंग चढोक , विक्रमसिंग कंढा व वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले . रक्तदान केलेल्याना अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात आले .
एशियन आय हॉस्पिटलच्यावतीने पाचशे जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणीसाठी हरमिंदरसिंग घई व दलजितसिंग रॅन्क यांनी विशेष परिश्रम घेतले .
यावेळी उत्सवासाठी पूना इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेण्ट २०० विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले . आम आदमी पार्टि पुणेतर्फे गुरूनानक जयंती प्रित्यर्थ कँप गुरूद्वारा येथे भाविकांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी मुजुमदार काका,अलीभाई,आनंद अंकुश,राजेश चौधरी, सुभाष करांडे,असगर बेग, शितल मित्तल,रज्जाक शेख,इफ्तकार खान,जान जगदानी,फेलिक्स इतर आप कार्यकर्ते उपस्थित होते.

