पुणे-रॉयल ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रफुल कोठारी (रॉयल ग्रुप) लिखित गाणे ” हम बेटियोको पढायेंगे …. हम बेटीयोको बढायेगे ….. ” या ध्वनिचितफितीचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाले. पूना क्लबमधील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास रॉयल ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रफुल कोठारी , गौरी ढोलेपाटील , श्रीमती शांताबाई कोठारी , योगिता कोठारी , रिध्दी कोठारी , लब्धी कोठारी , आरजू सोमजी , अंशिका कर्णावट , प्रियांका मेहता , सपना मुथ्था , प्रिया कर्णावट , शीतल चोरडिया , सोनिया लखानी , संजय कोठारी , मनीष मेहता , अंकुश मेहता , योगेश कर्णावट, आशा मेहता , डॉ. क्रांती जांभुळकर , रियाझ नदाफ व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन रॉयल ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रफुल कोठारी (रॉयल ग्रुप), गौरी ढोलेपाटील , श्रीमती शांताबाई कोठारी , योगिता कोठारी व उपस्थित असलेल्या मुलींच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी रॉयल ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रफुल कोठारी (रॉयल ग्रुप) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , समाजात स्त्री भृण त्या रोखण्यासाठी आपण या गाण्याची निर्मिती केली आहे . समाजात मुलीविषयी असणारी कमीपणाची भावना या गाण्यामुळे नक्कीच कमी होईल , भारतातील सर्व मुली , विशेषकरून शेतकऱ्याच्या मुली व पोलिसांच्या मुलींसाठी आपण हे गाणे समर्प्रित करीत आहोत . हे गाणे लोकांनी आपल्या गाण्यातून समाजात नक्कीच जनजागृती होईल . या गाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आपण ध्वनी चित्रचित्रफितीचे वाटप सामाजिक संस्थांना मोफत वाटप करणार आहोत .