पुणे-कात्रज येथील जनसेवा फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमास येवलेवाडी येथील सेराटेक सिटीच्यावतीने जीवनउपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले . जीवनउपयोगी वस्तूंमध्ये १०० किलो तांदूळ , सहा किलो लाडू , ४० ब्लॅंकेट , ४० बेडशीट , ४ बकेट , बारा मग , टूथपेस्ट , डेटॉल साबण ,क्रिकेट बॅट , टेनिस बॉल , बिस्कीट बॉक्स , चॉकलेट बॉक्स , डायपर बॉक्स आदी वस्तूंचा समावेश होता .
कार्यक्रमाची सांगता श्री गणेशाची प्रार्थना लहान मुलांच्यावतीने करण्यात आली . या जनसेवा फाऊंडेशनच्या निराधार केंद्रात गेल्या २७ वर्षांपासून आरोग्यसेवा , वृध्द सेवा , निराधार सेवा , शिक्षण , प्रशिक्षण , संशोधन व आदर्श गाव विकास आदी विकास क्षेत्रातून समाजसेवा करीत आहे . सुमारे १०० निराधार स्त्री पुरुष असून ५० मुले मुलींची येथे सोया केली असून शालेय शिक्षण दिले जाते . यावेळी मुनिराम अग्रवाल ,सागर महामूनकर , पंढरीनाथ तुसे , जितेंद्र जैन , रविंद्र वर्मा , एस. खोडके , नीलिमा बोरकर , जितेंद्र राठोड , सुधीर बरमे , कांचन वर्मा , वैशाली पापल , काका गर्दे , ब्रजेश सिंग आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी जनसेवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते सुषमा चव्हाण , मालती भावसार , दुर्गा लिंगडे, अरुणा तातरव प्रमोद महिषी आदी मान्यवर उपस्थित होते .