पुणे-वानवडी जवळील भैरोबानाला मधील श्री भैरवनाथ मंदिरामधून श्री स्वामी समर्थ पालखीचे अक्कलकोटकडे उत्साहात प्रस्थान झाले . पहाटे काकडआरती करण्यात आली त्यानंतर महापूजा व अभिषेक झाला . त्यानंतर दिनेश हेगडे व गणेश हेगडे बंधू यांच्याहस्ते सामूहिक आरती करण्यात आली . त्यानंतर सर्व स्वामी भक्तांनी प्रसाद घेतला . स्वामींच्या जयघोषात , हातामध्ये भगवा पताका धरून असंख्य स्वामी भक्त पायी पालखीमध्ये सहभागी झाले होते .
यावेळी सूर्यकांत चौघुले , सुभाष जांभुळकर , विजया चौघुले ,सोपानराव गवळी , शाम जांभुळकर , पंढरीनाथ साबळे , अनिल गवळी , निलेश सायकर , पुंडलिक गवळी , नयन मलिक , मकसूद सरकार , राजू चौघुले , ज्ञानेश्वर जांभुळकर , संजय बनकर , सुजाता बनकर आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी सकाळी नाष्टयाची व्यवस्था दिनेश हेगडे व गणेश हेगडे बंधूनी केली होती .यावेळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णा देशमुख उपस्थित होते .