पुणे-रास्ता पेठमधील अय्यप्पा मंदिराच्यावतीने पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई व दिवाळी फराळ देउन केरळी बांधवानी सामाजिक बांधिलकी जोपासली . गेले दहा वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो . यावेळी अय्यप्पा मंदिराचे अध्यक्ष जनार्दन पॊदूवल , राजेश पॊदूवल , नगरसेवक विशाल धनावडे , तेजेंद्र कोंढरे , उपाध्यक्ष व्ही. सुब्रमण्यम अय्यर , सचिव महेश पॊदूवल , सहसचिव पी . शशांक नायर , सदस्य विजय पॊदूवल , एम. पी. नायर , के. विजयकुमार , जयंती नायर , के. एस. आर. नायर , व्ही. एस. पिलाई , राजेश पॊदूवल , माधवन नंबियार , सुरेश नायर , मोहनदास नायर , जगदीश पॊदूवल आदी म्णायवर उपस्थित होते .
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे स. गो. बर्वे शाळेमधील कोठीमधील मुकादम राजू पेटाडे , सॅनिटरी इन्स्पेकटर समीर मसुरकर , डेप्युटी सॅनिटरी इन्स्पेकटर राम सोनवणे , सफाई कामगार राजेश कुचेकर , अनिल वाघमारे , संजय सकट , उत्तम दस्तुरे , भरत सकट आदी कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली .
यावेळी नगरसेवक विशाल धनावडे यांनी सांगितले कि , गेल्या दहा वर्षांपासून केरळी बांधव महापालिकेच्या सफाई कर्मचारी बांधवाना मिठाई वाटप करून आपली दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे . सफाई कर्मचारी आपला परिसर स्वछ ठेवून आपली आरोग्याची काळजी घेत असतात . त्यांच्या जीवनात अशा कार्यक्रमातून त्यांनी आनंद निर्माण केला आहे .