पुणे-युवा माळी संघटनेच्यावतीने दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयोजक दीपक कुदळे , नगरसेविका रंजना टिळेकर , अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे सचिव दिलीप राऊत , नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. सुरेश तोडकर , ओ. बी. सी. नेते मृणाल ढोलेपाटील, नगरसेविका मनिषा संदीप लडकत आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयोजक दीपक कुदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि , मुलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे आपले करिअर करावे , जीवनात प्रथम गुरु आपले आई वडील आहेत . विद्यार्थ्यांनी स्माईल नुसार काम केले तर ते नक्कीच यशस्वी होतील . त्यासाठी त्यांनी जीवनात यशस्वी होण्याची पाच सूत्रे समजावून सांगितली . एखाद्या गोष्टीत यशस्वी होण्यासाठी त्यांनी जाणकारी घ्यावी , त्यानंतर ज्ञानकारी व्हावे , त्यानंतर अमंलकारी , त्यानंतर लाभकारी होऊन आपण बराबरी करावी असे त्यानंबी समजावून सांगितले .
यावेळी विद्यार्थ्यांना करिअर विषयावर व्याख्यान देताना नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. सुरेश तोडकर यांनी सांगितले कि , तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठणे म्हणजेच करिअर होय . करिअर करण्यासाठी उच्च ध्येय ठेवले पाहिजे . आपल्या आवडीनुसार करिअर निवडले पाहिजे . त्यासाठी विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी वर भर द्यावा .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनिता भगत यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप लडकत यांनी केले तर आभार स्मिता लडकत यांनी मानले .

