पुणे-देशी फार्मस दुग्ध व्यवसाय आधुनिक पध्दतीने करत असल्याने कॅशलेस इंडियासाठी या दुग्ध व्यवसायातून क्रांती घडणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले . सोमवार पेठ येथील कमला हाईटसमध्ये देशी फार्मसचे शाखेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले .
त्यांनी सांगितले कि , देशी फार्मस हा आपला दुग्ध व्यवसाय आधुनिक पध्दतीने करत आहे . ग्राहकांचे पैसे हे ऑनलाईन पद्धतीने देशी फार्मसच्या खात्यावर जमा होणार आहेत . तसेच दूध न दिल्यास तशी नोंद देखील ऑनलाईन पध्दतीने होणार आहे . त्यामुळे ग्राहकास आणि दूध विक्रेता डिजिटल पध्दतीने व्यवहार होत आहे . त्यामुळे कॅशलेस इंडियासाठी या दुग्ध व्यवसायातून क्रांती घडणार आहे .
या उदघाटन सोहळ्यास शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , क्रीडा समिती अध्यक्ष व नगरसेवक सम्राट अभय थोरात , देशी फार्मसचे संचालक अलोक पवार , प्रतिक गुप्ता , देशी फार्मसचे सोमवार पेठ शाखेच्या संचालिका ऐश्वर्या सम्राट थोरात , हिराबाग मंडळाचे अध्यक्ष अभय थोरात ,शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविण गायकवाड नगरसेविका आरती कोंढरे , नगरसेवक अजय कोंढरे , नगरसेवक योगेश समेळ व अन्य मान्यवर उपस्थित होते .
गीर गाय पासून उत्पादन खाद्य पदार्थ देशी फार्मसची पुण्यात सातवी ब्रँच हे सोमवार पेठेत चालू करण्यात आली . अशी माहिती देशी फार्मसचे संचालक अलोक पवार यांनी दिली .