पुणे-कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंगळवार पेठमधील अखिल मंगळवार पेठ नवरात्र महोत्सव समितीच्यावतीने अष्टभुजा माता मंदिराचा जिर्णोव्दार करून लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाचे आयोजन संजयभाऊ खुडे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल देवकुळे , कार्याध्यक्ष सनी मायनर , समितीचे अध्यक्ष कपिल लोंढे , उपकार्याध्यक्ष किरण धेंडे , खजिनदार कुमार वेळेकर , उपाध्यक्ष पैलवान विजय खुडे यांनी केले होते .
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट , अध्यात्मिक गुरुवर्य बाळासाहेब ठोंबरे , शिवसेना शहर संघटक अजय भोसले , माजी नगरसेवक सदानंद शेट्टी , कामगार नेते सतीश लालबिगे , नगरसेविका पल्लवी जावळे , उमेश चांदगुडे , नितीन परतानी ,माजी नगरसेवक प्रशांत बधे , नगरसेविका सरस्वती शेंडगे , माजी नगरसेवक विजय मारटकरआदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी होमहवन व महाप्रसाद , देवीची मिरवणूक संपन्न झाली . तसेच मंगळवार पेठ भागात स्वछता अभियान राबविण्यात आले . जेष्ठ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . भोंडला आणि रासदांडियाचा कार्यक्रम झाला . मिरवणूक मंगळवार पेठ , श्रमिक नगर , श्रीकृष्ण चौक , भीमनगर , कमला नेहरू चौक , शेट्टी कॉर्नर , तोडकर हॉस्पिटल व पारगे चौक या भागात काढण्यात आली .