पुणे-
स्वछता सेवा सप्ताहमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबाबदल पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश कणसे यांना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते ” उत्कृष्ट स्वछता दूत पुरस्कार ” देउन सन्मानित करण्यात आले . या पुरस्कारांमध्ये प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी खासदार अनिल शिरोळे ,महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव आदी मान्यवर नगरसेवक वर्ग , बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
निलेश कणसे हे पंधरा ऑगस्ट चौकाचे अध्यक्ष असून कुंभार बावडी बाजारपेठ तसेच महात्मा गांधी मार्गावर त्यांनी स्वछता अभियान राबविले . तसेच पंधरा ऑगस्ट वृत्तपत्र वाचनालय ते संचालक आहेत . असे काम करण्याची प्रेरणा श्री. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाली आहे .


