पुणे-अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब अग्रसेन यांच्यावतीने चंदन नगर येथे साईबाबा मंदिर हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न यामध्ये दंत , नेत्र , चिकित्सा शिबीर घेण्यात आले मोफत चष्मे वाटप करण्यात आले . फिजिओथेरपी , होमिओपॅथी तपासणी आदींचे शिबीर घेण्यात आले .
या शिबिरात ३८० नागरिकांनी लाभ घेतला . या शिबीराचे आयोजन राजेश सुरेंद्रकुमार अग्रवाल , अग्रवाल समाज नगर रोड , अग्रसेन डायनोस्टिक सेंटर , अग्रसेन सेवा संस्था यांनी केली . शिबिराचे उदघाटन लायन परमानंद शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे अमोद गोयल , विनोद अग्रवाल , सुरेश अग्रवाल , महेश अग्रवाल , उमेश अग्रवाल , विशाल अग्रवाल , त्रिलोकचंद अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते . या शिबिरासाठी डॉ अविनाश वाघमारे , डॉ. शीतल भुतडा , तनुजा रॉड्रिक्स , डॉ. विनायक चौधरी , डॉ. शिलभद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले