पुणे-
डी डेन्ट केअर या संस्थेच्यावतीने दंत चिकित्सा व तोंडाचा कॅन्सरचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले . या शिबिरामध्ये ७०० जणांनी आपली वैद्यकीय तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला . भवानी पेठमधील दिनशा अपार्टमेंटमधील संस्थेच्या आवारात हे आरोग्य शिबीर संपन्न झाले . या शिबिराचे उदघाटन प्रसिध्द दंत चिकित्सक डॉ. दत्तात्रय दरवडे यांच्याहस्ते करण्यात आले .
या शिबिरात किडलेल्या दातांची तपासणी , दातांच्या संबधित हाडांची तपासणी , तोंडातील दुर्गंधीच्या कारणांची तपासणी , दंतरोपणाविषयी मार्गदर्शन , पडलेल्या दांताविषयी मार्गदर्शन व तबाखुजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या तोंडाच्या कॅन्सरची तपासणी करण्यात आली . या कॅन्सरमध्ये मिसरी , गुटखा , मावा व सिगारेट यापासून कॅन्सर रुग्ण आढळले .
या आरोग्य शिबीरासाठी प्रसिध्द दंत रोग तज्ञ डॉ. आशिष दरवडे , डॉ . प्रज्ञा दरवडे , डॉ. शमा दरवडे , डॉ. रौनक ओसवाल व डॉ. प्रतिक राऊत या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले

