बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत वैष्णवीचे यश

Date:

पुणे-बँकॉक येथे इंडियन आर्ट कल्चरल सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत तुकाई दर्शन हडपसर येथील वैष्णवी सुनिल औरसंग हिने मोठ्या गटात एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला . प्रसिध्द कथ्थककार पदमविभूषण पंडित बिरजू महाराज यांची नात इंडियन क्लासिकल डान्सर सिंजींनी कुलकर्णी यांच्याहस्ते वैष्णवी सुनिल औरसंग  हिला स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले .

वैष्णवी गेली १२ वर्षे नृत्य करत असून भरतनाट्यमचा विद्यापीठाचा पदविका अभ्यास पूर्ण केलेला असून , अखिल भारतीय महाविद्यालयाचा विशारदचा अभ्यास चालू आहे . वैष्णवीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे मिळविली आहेत .

 वैष्णवीची आई अश्विनी या पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेत कार्यरत असून तिचे वडील सुनिल हे अभियंता म्हणून कार्यरत आहेत . आपल्या आई वडिलांच्या पाठबळामुळे आपण हे यश मिळविले .

तिला गरजू होतकरू मुलांना नृत्य शिकविण्याची आवड आहे . त्यासाठी तिने काळेपडळ येथे वैष्णोमुद्रा अकँडमी सुरु केली असून अकँडमीच्या माध्यमातून ती मुलांना नृत्याचे धडे देत आहे . ती स. प. महाविद्यालयात कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत असून तिला नृत्यात करिअर करायचे असल्याचे तिने सांगितले . तिला जपानी भाषा देखील अवगत आहे . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...