” शिवसह्याद्री गौरव पुरस्कार ” ने भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) संस्था , ज्ञान कि लायब्ररी प्रकल्पाचे संस्थापक प्रदीप लोखंडे, प्रसिध्द वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे सन्मानित

Date:

पुणे-शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनतर्फे यंदाचा शिवसह्याद्री गौरव पुरस्काराने भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेस  ,वाचन संस्कृती चळवळीसाठी योगदान देणारे ज्ञान कि लायब्ररी प्रकल्पाचे संस्थापक प्रदीप लोखंडे , प्रसिध्द वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांना भारती  विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . यामध्ये भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड , प्रदीप लोखंडे यांची कन्या युगांतीं प्रदीप लोखंडे व  वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात आला . भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल कैलास जाधव , सुनील चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला . यावेळी दीड कोटी रुपयांचे शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले .

बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमास शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे , शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविणदादा गायकवाड , लागीर झालं जी या मालिकेतील मराठी अभिनेता निखिल चव्हाण ,  व्यंकटराव गायकवाड , अंकुश आसबे , सुनील कुशीरे , शांताराम कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी भारती  विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , आजच्या काळात नोकऱ्या करण्याचे दिवस संपले असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून युवकांनी पुढे गेलॆ पाहिजे . त्यासाठी नियोजन असणे आवश्यक आहे . तरुणांनी कोठून आलो आहोत , कुठे आहोत , कुठे जायचे हे कधीही विसरू नये , भान ठेवून योजना आखल्या पाहिजेत आणि बेभान होऊन त्या वापरल्या पाहिजेत . भारती विद्यापीठ सुरु करताना आम्हालां अनेक अडचणींचा सामना करावा लागला , परंतु आम्ही डगमगलो नाही , यश अपयश पचवून उभे राहिलो , त्यामुळे भारती विद्यापीठाने दिल्लीमध्ये आपली शिक्षण संस्था उभारू शकली . राजेंद्र कोंढरे हे देखील जिद्दीने अनेक सामाजिक संस्थांमध्ये कौतुकास्पद कार्य करीत आहे .

यावेळी  वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे  यांनी सांगितले कि ,आपल्याकडे  २० टक्के नागरिक भारतात राहतात तर ८० टक्के नागरिक इंडियात राहतात . हा देश मूठभर लोकांच्या हातात चालला आहे . आजच्या तरुणाला लगेच राजकीय आखाड्यात उतरण्याचे वेध लागतात . त्यामुळे आपल्याकडे आय ए एस अधिकारी दिसून येत नाही , पंतगराव कदम व हणमंतराव गायकवाड यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीत देखील आपले विश्व् निर्माण केले . आज कार्पोरेट कंपन्यांमध्ये व सरकारी खात्यामध्ये आपल्या युवकांना नोकऱ्या नाहीत . त्यामुळे येथील युवकांनी करायचे काय ? त्यामुळे युवकांनी नुसत्या राजकारणापेक्षा एखाद्या उद्योगात आपण काय करू शकतो का ? हे पाहिले पाहिजे . शिक्षणाशिवाय तुम्ही कोणत्याही आरक्षणाशिवाय जीवनात पुढे जाऊ शकता  .

यावेळी  भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले कि , लढाई हि प्रत्येकाच्या आयुष्यात आहे . फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे . त्यामुळे आयुष्यात वेगळे करून दाखवा , तुमचा आत्मविश्वास प्रबळ असला पाहिजे . नवनवीनकल्पना आपल्या व्यवसायात राबवा , त्याच तुम्हाला पुढे नेऊ शकतील . काम करीत असताना तुमच्या बरोबरच्या लोकांना मोठे करा तेंव्हा भारत देश हा मोठा होणार आहे . आपण आज प्रतिकूल परिस्थितीमधूनच पुढे आलो आहे .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले तर सूत्रसंचालन अभिषेक मोहोळ यांनी केले तर आभार नितीन साळुंके यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ऑनलाइन व्यासपीठांच्या माध्यमातूनच सिलेंडरची नोंदणी करावी असे केंद्र सरकारचे आवाहन

एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रत्यक्षात कारवाई सुरू केंद्र...

MNGL कडून हॉटेल व व्यावसायिक गॅस जोडणीला प्रोत्साहन

२०० हून अधिक रेस्टॉरंट्सना जलद गतीने गॅस कनेक्शन पुणे:...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. १३ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व...