पुणे-गुडफ्रायडे निमित्त रास्ता पेठमधील ख्राईस्ट चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले . यामध्ये गुड फ्रायडे निमित्त सात उपासना ख्राईस्ट चर्चचे सिनियर पास्टर रेव्ह. डॉ. सी. पी. भुजबळ व पास्टर मनोज तेलोरे यांनी मार्गदर्शन केले . यामध्ये क्षमेचा उद्गार , तारणाचा उद्गार , ममतेचा उद्गार , दुःखाचा उद्गार , क्लेशाचा उद्गार , विजयाचा उद्गार , समाधानाचा उद्गार आदी उपासना सांगण्यात आल्या .
यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते . यावेळी ख्राईस्ट चर्चचे सेक्रेटरी चित्तरंजन पोळ , खजिनदार संतोष घोरपडे , मुख्य समन्वयक मयूर बोर्डे , माजी सेक्रेटरी सतीश चांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते .

