पुणे- लष्कर भागात सोलापूर बाजार येथे श्री बालाजी मंदिरात ” कल्याणोत्सव सोहळा ” उत्साहात साजरा करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री जगतपिता भगवान बालाजी , लक्ष्मीमाता , पदमावती यांचा विवाह सोहळा पार पडला . यामध्ये नवचंडीका पूजा अर्चना व होम , श्री विष्णू सहस्त्रनाम हवन पूजा ,आहुती व आरती , चुडा भरणे , हळदी समारंभ त्यानंतर श्री जगतपिता भगवान बालाजी , लक्ष्मीमाता , पदमावती यांचा विवाह सोहळा पार पडला . त्यानंतर महाआरती करण्यात आली . यावेळी भव्य रथयात्रा पुणे लष्कर भागात काढण्यात आली . तसेच , प्रविण कन्नन यांचा श्री बालाजी भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला . या रथयात्रा मिरवणुकीत नादब्रम्ह ढोलताशा पथक सहभागी झाले होते . यावेळी मोठ्या संख्येने बालाजी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
या उत्सवामध्ये , श्री बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश रामचंद्र जेधे ,नगरसेवक विवेक यादव , नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेवक प्रशांत जगताप ,मन्नू कागडा व अन्य मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन श्री बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश रामचंद्र जेधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते .