पुणे-” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. गिरीश सरडे व लोकमान्य उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. के. यादव यांच्याहस्ते करण्यात आले . पर्वतीमधील निर्मल बाग हॉलमध्ये झालेल्या ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सोहळ्यास योगाचार्य सतीश अरगडे , आंतरराष्ट्रीय योगाचार्य शिवाजी घोडके , ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे , डॉ. मृणाल आशय जमदाडे , लोकमान्य नर्सिंग होमच्या संचालिका डॉ.सुरेखा यादव, समाजसेविका मेघना ससाणे , टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रा. मनोजा जोशी , अजित जमदाडे , सुनिता जमदाडे , सुप्रिया ताम्हाणे , शितल कचरे आदी मान्यवर उपस्थित होते .
आजच्या धकाधकीच्या काळात महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर घर व्यवस्थित राहील . महिलांनी आपल्या दैनदिन जीवनातून आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे . त्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना योगासने व प्राणायाम करता येतील . या पुस्तकात सर्व आसनांची माहिती सचित्र माहितीसह प्रकाशित केली आहेत . त्यामुळे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे . अशी माहिती ” योगासने आणि प्राणायाम ” या पुस्तकाच्या लेखिका कमल मारुती ननावरे यांनी दिली .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक कमल मारुती ननावरे यांनी केले तर सूत्रसंचालन मंगल बोरावके यांनी केले तर आभार डॉ. मृणाल आशय जमदाडे यांनी मानले .