पुरंदरेंचा पदमविभूषण पुरस्कार मागे घ्या – भीम आर्मीची मागणी

Date:

पुणे-शिवशाहीर  पुरंदरे यांना पदमविभूषण पुरस्कार जाहीर झाला  आहे . याला आक्षेप घेत भीम आर्मी पुणे शहर शाखेच्या वतीने निषेध करीत तीव्र निदर्शने करण्यात आले . बेलबाग चौक सिटी पोस्ट येथे भीम आर्मीचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांच्या नेर्तृत्वाखाली करण्यात आली . आणि शासनाने हा पुरस्कार मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली .

 पुरंदरे यांनी आजपर्यंत इतिहासाचे विकृतीकरण करून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्य आणि बदनामीकारक लिखाण केले आहे . ज्यामुळे या महापुरुषांची खरी ओळख समाजासमोर आली नाही . व बहुजन समाजाची दिशाभूल झाली त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊंची बदनामी करून , जेम्स लेन सारख्या शिवद्रोही व्यक्तीला माहिती पुरवून परिवर्तनवादी जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे . अशा व्यक्तीला पदमविभूषण देउन देऊन गौरव करणे योग्य नसून , हा अपमान आहे . त्यामुळे त्यांना जाहीर झालेला पुरस्कार तात्काळ मागे घ्यावा हि मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली . यावेळी नीता आडसुळे , दीपाली भालेराव , मीना गवळी , अभिजित गायकवाड , आबा सावंत , अंतिम जाधव , शरद ओव्हाळ , सीताराम गंगावणे , गौतम कोट , मुकेश गायकवाड , भीमराव कांबळे , राजू वाघमारे , गणेश पगारे , अजित गायकवाड , अमर पडागळे , महादू खळगे , वैभव सावंत , सुमित वाघमारे , श्रीकांत शेंडगे , जयवंत पोळ , बाळू गायकवाड , राकेश साबळें , विनोद शिंदे , दयानंद कांबळे , अर्जुन सोनवणे , प्रकाश म्हस्के , आश्रफ खान , अलोक भिंगारदिवे आदी सहभागी झाले होते . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...