” मराठी पत्रकार दिन ” सोहळा उत्साहात संपन्न

Date:

पुणे-मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२  रोजी सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने पुणे मीडिया वॉच व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या वर्षी ” मराठी पत्रकार दिन ” सोहळा उत्साहात संपन्न झाला . यंदाच्या सोहळ्याचे चौदावे वर्ष होते  .

 नवी पेठमधील गांजवे चौकाजवळील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये येथे झालेल्या या  ” मराठी पत्रकार दिन ” सोहळ्याचे  उदघाटन  दर्पणकार  बाळशास्त्री जांभेकर  यांचे प्रतिमेस माजी आमदार मोहन जोशी यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहराचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे ,पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर , सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालयचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला , डॉ. भगवान यादव , मनजितसिंग विरदी , भीमराव पाटोळे , मंजिरी धाडगे , संगीता आठवले , प्रा. वाल्मिक जगताप , शिवानंद हूल्ल्याळकर , श्याम सहानी , फिरोज मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते .

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यामध्ये नामदेव ढसाळ पत्रकारिता पुरस्कार हा सुगावा प्रकाशनचे प्रकाशक व दै. बहुजन महराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक विलास वाघ , बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार  पुरस्कार हा पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग , पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार हा गेली ५० वर्षापासून दै . आज का आनंदचे व दै संध्यानंदचे संस्थापक संपादक श्याम अग्रवाल ,  उत्कृष्ट जनसंपर्क पुरस्कार हा गेली ३० वर्षांपासून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असलेले ” अक्षरकला  ” या जनसंपर्क संस्थेचे संचालक  प्रविण वाळिंबे , उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै. इंडियन एक्सप्रेसचे  वृत्तपत्र छायाचित्रकार आरुल होरायझन , उत्कृष्ट इलेट्रॉनिक माध्यम पुरस्कार माय मराठी वेब मीडियाचे संपादक शरद लोणकर , उत्कृष्ट उपसंपादक हा दै. पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे , उत्कृष्ट गुन्हे वार्तांकन पुरस्कार हा  दै. पुणे मिररच्या पत्रकार अर्चना मोरे ,  प्रदीप रणपिसे राजकीय पत्रकारिता पुरस्कार हा दै आज का आनंदचे पत्रकार शैलेश काळे , उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. केसरीचे पत्रकार स्वप्नील पोरे , उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता पुरस्कार हा दै. सकाळ टाइम्सचे अश्व शर्यतीचे पत्रकार व पुणे रेसिंग जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर सय्यद , उत्कृष्ट उपनगर वार्ताहर हा दै. लोकमतचे उपनगर वार्ताहर प्रमोद गव्हाणे ,सिटीझन जर्नालिस्ट पुरस्कार हा अनिल अगावणे  , ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुंक्यातील साप्ताहिक महामित्रचे संपादक दशरथ फुले , सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय पुरस्कार हा भवानी पेठमधील सापिका येथील हिंद बाल समाज मंडळ ट्रस्ट संचालित ज्योती वाचनालय , उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार हा वानवडी येथील श्रीगणेश न्यूज पेपर एजन्सीचे संचालक अतुल भुजबळ आदींचा सन्मान स्मृतिचिन्ह , शाल व पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात आले .

व्याख्यानामध्ये ” बदलते तंत्रज्ञानांचे माध्यमासमोरील आव्हाने ” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविदया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संजय विष्णू तांबट यांनी सांगितलॆ कि , सामाजिक माध्यमांमुळे प्रिंट मीडियावर परिणाम झाला . बदलती माध्यमे रूपे व वाचकांची गरज समन्वय  साधून वृत्तपत्रांनी बदल स्वीकारला पाहिजे हि काळाची गरज आहे . नव्वदच्या दशकामध्ये वाचकांना वृत्तपत्र , साप्तहिक व मासिके माध्यमे फक्त उपलब्ध होती मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमे आल्यानंतर वाचकांचा कल बदलला मात्र प्रिंट मीडियाचे महत्व अबाधित राहिले . विस्तृत स्वरूपात माहिती हि आज देखील वृत्तपत्रातच दिली जात आहे ., मात्र सोशल मीडियावर आज प्रत्येक जण बातमी देऊ लागला आहे . त्यामुळे वृत्तपत्रांच्या वाचकांवर मोठा परिणाम झाला .

पुणे शहराचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे  यांनी आपले अध्यक्षस्थानी बोलताना  सांगितले कि ,  एकेकाळी वृत्तपत्रावर कोणती बातमी घायची हे ठरले जायचे मात्र अलीकडे गुन्हेगारीच्या बातम्या सर्रास पहिल्या पानावर दिल्या जात आहे . वाजवीपेक्षा त्याला जास्त महत्व दिले जात आहे . कोणत्याही सेलिब्रिटींच्या वैयक्तिक जीवनाची बातमी तिखट मीठ लावून झळकाविले जाते . अशा बातम्यांना प्राधान्य दिले जाऊ नये . सामाजिक विषयांना व  नागरि समस्यांना  वर्तमानपत्रात जागा दिली पाहिजे . वाचकांची अभिरुची सांभाळण्यासाठी वृत्तपत्रांनी नवीन माहिती दिली पाहिजे . सोशल मीडियावरील येणाऱ्या बातमीच्या पुढील बातमी काय आहे हे वृत्तपत्रांनी सांगितले पाहिजे .

  दै . आज का आनंदचे व दै संध्यानंदचे संस्थापक संपादक श्याम अग्रवाल यांनी  पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , आज का आनंद सुरुवातीला १५ पैशाला  पेपर विकला जात होता आज हा पेपर सात रुपयांना विकला जात आहे . वृत्तपत्र चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे . २४ तास यंत्रणा राबविल्यानंतर वृत्तपत्र तयार होते . वाचकांची गरज भागविण्यासाठी नवनवीन उपक्रम वृत्तपत्रे राबवितात.  आर्थिक गणिते जुळविताना कसरत करावी लागते. त्यासाठी संघर्ष करावा लागतो . वर्तमानपत्रे हि समाजाची गरज आहे , आजही आपलयाकडे छापील शब्दाला  मोठी किंमत आहे , त्यासाठी वर्तमानपत्र कायमस्वरूपी टिकवून राहतील .

 दै. पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे यांनी उत्कृष्ट उपसंपादक पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले कि , इलेक्ट्रॉनिक मीडिया आला तरी देखील प्रिंट मीडिया  आपली विश्वासहर्ता  कायम  टिकवून आहे . त्यामुळे आजही वृत्तपत्र वाचक दूर गेलेला नाही कारण नळावरील   पाणी भरणारी महिला पाणी येणार नसल्याची  माहिती हि पेपरमध्ये छापून आली आहे का ? असे विचारते हि विश्वासहर्ता  वृत्तपत्रांनी कायम टिकवून ठेवल्यामुळे  वृत्तपत्राचे महत्व अबाधित राहील त्यात शंका नाही , असा विश्वास बालगुडे यांनी व्यक्त केला .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर यांनी केले तर सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले  तर आभार सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालयचे ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर जोग , प्रशांत फुले ,संतोष गायकवाड , नितीन बाल्की व भारती अंकलेल्लू आदींनी विशेष परिश्रम घेतले .

या कार्य्रक्रमाचे आयोजन पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालयचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी केले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...