पुणे-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी पेठ काशेवाडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातर्फे ” आठवले चषक कॅरम स्पर्धेचे ” उदघाटन करण्यात आले . या कॅरम स्पर्धेचे उदघाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले . या कॅरम स्पर्धेचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप धांडोरे व पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष लियाकत शेख यांनी केले होते . या कॅरम स्पर्धेमध्ये ९६ कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला . यावेळी प्रमुख पंच म्हणून उमेश चव्हाण ,मनिष चव्हाण व राजू वानखेडे यांनी काम पाहिले . तर सहाय्यक पंच म्हणून रणजित लांडगे , विनोद लोंढे यांनी काम पाहिले .
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात ” आठवले चषक कॅरम स्पर्धेचे ” उदघाटन
Date:

