येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धा उत्साहात संपन्न

Date:

 पुणे-नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली  व बेस्ट सॅन्टाक्लॉज  स्पर्धाचे आयोजन करण्यात आली होती .या रॅलीतून  समाजात शांतता , सदभावना व पर्यावरण जनजागृतेचा संदेश देण्यात येणार आहे .तसेच नो डी. जे. चा संदेश देण्यात आला  .  तसेच , बेस्ट सॅन्टाक्लॉज  स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते  .प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखावा हा आपल्या चारचाकी वाहनातून सजावट करून आणून या रॅलीमध्ये स्पर्धक सहभागीझाले होते  .

सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून हि  रॅली सुरुवात बिशप वेलरीयन डिसोझा , नगरसेविका अश्विनी लांडगे व डॅनियल लांडगे यांच्याहस्ते ध्वज उंचावून करण्यात आले . . तसेच बेस्ट सॅन्टाक्लॉज  स्पर्धेमध्ये सर्व धर्मिय बांधव सहभागी झाले होते . तसेच प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलीहोती  . यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व चर्चला सहभागीझाले होते  .  महात्मा गांधी रोडवर येरवडा येथील डॉन बॉस्को शाळा , शंकरशेठ रोडवरील मोलेदिना टेक्निकल हायस्कुल व मुकुंदनगर येथील क्रेसेंट हायस्कुल मधील विद्यार्थी बँड पथक व जनजागृतीचे संदेश देणार आला  . वेगेगळ्या चर्चमधील तरुण तरुणी नाताळची गाणी गायली   . तसेच दहा वर्षीय लिट्ल ड्रमर वंडर बॉय मल्हार माने हा रॅलीमध्ये ड्रम वाजवून आपली कला सादर केली  .  या बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धा   व प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धा संपन्न झालीं. 

हि  रॅली , एम्प्रेस गार्डन जवळील सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून , सोलापूर रोड , फातिमानगर , विठ्ठलराव शिवरकर रोड ,जांभुळकर चौक , जगताप चौक , संविधान चौक , रहेजा गार्डन , गंगा सॅटेलाईट , नेताजी नगर , लुल्लानगर चौक , सी टी सी , गोळीबार मैदान चौक , ट्राय लक हॉटेल चौक , कोहिनुर चौक , महात्मा गांधी रोडमार्गे महावीर चौक , अरोरा टॉवर्स चौक ,  बुटी  स्ट्रीट , गवळी वाडा , मॅजेस्टिक हॉटेल , ख्राईस्ट चर्च मार्गे क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये रॅली समाप्त झाली  .

रॅली समाप्तीनंतर क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली  व बेस्ट शांताक्लॉज  स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न झाला . या पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहणे पुणे धर्मप्रांताचे प्रमुख बिशप थॉमस डाबरे , बाप्पुसाहेब भोसले , विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबराव बाबर ,समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेंडगे ,  फादर मारियानो डिसिल्वा , फादर अरुण त्रिभुवन , रिटा ऍंथोनी , सॅमसन नायडू , इलियास शेख , अझहर शेख , मेघराज पवार , एडवर्ड जेकब आदी मान्यवर उपस्थित होते .

या स्पर्धेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखावामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोरपडी येथील सेंट जोसेफ चर्चने पटकाविले . व्दितीय क्रमांकाचे कोंढवा खुर्द येथील अवर लेडी ऑफ लुडस चर्च तर तिसरा क्रमांक घोरपडी येथील सेंट ऍंथोनी चॅपल (जॉली बॉईज ग्रुप) हे विजेते ठरले .

या बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व्ही व्ही एन फ्रान्सिस तर व्दितीय क्रमांक निकोलस व्हिक्टर राज नयकाम आड विजेते ठरले . विशेष बक्षिसे दहा वर्षीय लिट्ल वंडर ड्रमर बॉय मल्हार माने व हिरन पवार डान्स ग्रुप याना विशेष सन्मान पारितोषिक देण्यात आले .

या रॅलीचे संयोजन पीटर डिक्रूज , शालोम ख्रिश्चन असोसिएशनक्सचे संस्थापक अध्यक्ष ख्रिस्तोपर राजमनी, असोसिएशनचे सदस्य अंजलीस अँथोनी , येसुनंदन दोराईस्वामी , जेम्स दोराईराज , विल्सन डॅनियल  , बबलू रॉयल , केविन मॅन्युअल , विनेश पिल्ले , रिबेलो जेकब , रॉकी आरोक्यु स्वामी , ऐरण डिक्रूज , डेव्हिस देवदास , सुशीला जेराड जोसेफ , जानेस फर्नाडिस , रॉकी लोबो , मॉन्टी डेनिस जेकब , अँथोनी पिल्ले , सँडी आथर बरोज, फ्रांसिस अँथोनी   व नोएला कांबळी आदीने केले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...