पुणे-जय वैभव लक्ष्मी फाऊंडेशनच्यावतीने यंदाचा “ जय वैभव लक्ष्मी पुरस्कार “ पुण्यधाम आश्रमाच्या प्रमुख श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी )याना महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते देण्यात आला . या पुरस्कारांमध्ये स्मृतिचिन्ह , कोंढवा येथील पुण्यधाम आश्रमाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पदमभूषण डॉ. विजय भटकर , जय वैभव लक्ष्मी फाऊंडेशनचचे अध्यक्ष उल्हासदादा पवार , उपाध्यक्ष ऍड. शशिकांत पागे , सचिव प्रा. व्ही. एस. अंकलकोटे पाटील , विश्वस्त श्रीमती आशा काळे , डॉ. स्वरूप एकलुरे , मिथुन गुरव , सौरभ व्ही. अंकलकोटे पाटील , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर नगरसेविका स्मिता वस्ते , नगरसेविका संगीता ठोसर , पुण्यधाम आश्रमचे विश्वस्त दीपक पायगुडे , घनश्याम झंवर , रमेश झंवर आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले कि , पुण्यधाम आश्रम हे माझे आजोळ आणि घर आहे . त्यांचा भगवान शिवजींचा आशीर्वाद आहे . माताजींचे प्रत्येक कार्यपणे पुण्यधाम आश्रमात सेवा करणारी देवता आहे . त्यांच्याकडून प्रत्येकाला काम करण्याची प्रेरणा मिळते . त्यांच्या कार्याला आपण सर्वजण वंदन करू या .
यावेळी पुण्यधाम आश्रमाच्या प्रमुख श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी )यांनी सांगितले कि , जीवनात आपण खूप दुःख सहन केले त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण या पुण्यधाम आश्रमाची स्थापना केली . विश्व जागृती मिशन ट्रस्टचे कार्य या आश्रमात सुरु केले . पाहता पाहता हा सामाजिक कार्याचा वटवृक्ष बहरू लागला . या माझ्या कार्याला सर्वानी प्रेम दिले . असेच काम करण्याची प्रेरणा आपल्याला ईश्वराकडून मिळो अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली .
यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पदमभूषण डॉ. विजय भटकर यांनी देखील पुण्यधाम आश्रमाच्या प्रमुख श्रीमती कृष्णा कश्यप (माताजी ) यांच्या कार्याचे कौतुक आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत जय वैभव लक्ष्मी फाऊंडेशनचचे अध्यक्ष उल्हासदादा पवार यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार जय वैभव लक्ष्मी फाऊंडेशनचे सचिव प्रा. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांनी मानले . या कार्यक्रमाची वंदेमातरमने सांगता झाली .