पुणे-भारतीय दलित कोब्राच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नागरिकांच्या विविध मागण्यासाठी बैठा सत्याग्रहास सुरवात करण्यात आली . हा बैठा सत्याग्रह सर्व जाती धर्माच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे , दलित ओ बी सी मागास विद्यार्थ्यांना सर्वच शिक्षण मोफत देण्यात यावे , बेघरांना हक्काचा निवारा देण्यात यावा व इतर मागण्यांसाठी हा बैठा सत्याग्रहास सुरवात करण्यात आली . भारतीय दलित कोब्राचे कोब्राराजे ऍड. भाई विवेक चव्हाण यांच्या नेर्तृत्वाखाली या बैठा सत्याग्रह्यामध्ये मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले . शुक्रवार २१ डिसेंबर २०१८ ते सोमवार २४ डिसेंबर २०१८ पर्यंत हा बैठा सत्याग्रह असणार आहे . या मागण्याचे निवेदन शासनास दिल्याचे भारतीय दलित कोब्राचे कोब्राराजे ऍड. भाई विवेक चव्हाण यांनी सांगितले

