पुणे-वानवडीमधील बापूसाहेब केदारी प्रतिष्ठानच्यावतीने ३००० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ् व प्रमाणपत्र देउन करण्यात आला.
केदारीनगर परमार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे संयोजन बापूसाहेब केदारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक शिवाजीराव केदारी ,माजी नगरसेविका भावना केदारी , साहिल केदारी व नेहा केदारी यांनी केले होते . या कार्यक्रमास अभय छाजेड , सुदामराव जांभुळकर ,महेश पुंडे , जगन्नाथ खोपकर , दीपक केदारी , ऍड. विजय राऊत , शारदा कवितके , किसन केदारी , संजय जांभुळकर , सूर्यकांत चौघुले , विद्याधर चव्हाण , शारदा कवितके , पुंडलिक गवळी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी करिअर या विषयावर सुनिल पंडित यांनी व्याख्यान दिले . तर कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत माजी नगरसेवक शिवाजीराव केदारी यांनी केले तर सूत्रसंचालन अनुप दिक्षित यांनी केले तर आभार साहिल केदारी यांनी मानले .
यावेळी शिवाजीराव केदारी यांनी सांगितले कि , वानवडी परिसराचा विकास करताना या भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी अनेक शिक्षण संस्थांना उभारणीसाठी मदत केली , त्यामुळे आज विदयार्थी चांगले गुण मिळवून यश प्राप्त करीत आहे . बापूसाहेब केदारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना गेली ३२ वर्षांपासून प्रतिष्ठान मदत करीत आहे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव देखील करण्यात येत आहे .
यावेळी रमेश बागवे यांनी सांगितले कि , पालकांनी आपल्या मुलांचे भवितव्य उज्जल घडविण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. मुलांना मोबाइल वापरावर लक्ष ठेवले पाहिजे . केदारी कुटुंबीय गेली ३२ वर्षांपासून वानवडी भागात बापूसाहेब केदारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करीत आहे . त्यामुळे त्यांचा वानवडीच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा आहे .

