पुणे- लष्कर भागात विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली . भोपळे चौक येथे मानाचा कामाठीपुरा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ गणेशभक्त राजू सांकला यांच्याहस्ते प्रारंभ झाला . यावेळी पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी ,कामाठीपुरा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल केदारी , महेंद्र भोज , देवेंद्र कुऱ्हे , लष्कर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड , लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले , विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त इसाक जाफर , पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीचे सदस्य बापूसाहेब गानला , विकास भांबुरे , शाम सहानी , वाहिद बियाबानी, सुनिल शिंदे , बलबीरसिंग कलसीं , नगरसेवक दिलीप गिरमकर , संदीप भोसले , हसन कुरेशी आदी मान्यवर व गणेश भक्त उपस्थित होते .
या विसर्जन मिरवणुकीत हिंद तरुण मंडळाने शिवकालीन मर्दानी खेळ , शिवकालीन संगीत नृत्य , जागरण गोंधळ व गणेश स्तुती सादर केले . मर्दानी खेळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती . भीमपुरा गल्ली मधील यंग बॉयज क्लबच्या ढोल ताशा पथकाने सर्वांची माने जिंकली . तसेच कामाठीपुरा मंडळाचे तालवाद्य पथकाने भोपळे चौकात विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांना ठेका धरायला लावले . नवयुग सुर्वणकार मंडळाने आकर्षक फुलांची सजावट देखावा केला होता . श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ व श्री शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या मंडळाने संगीताच्या तालावर युवक नृत्य करत होती . त्याचप्रमाणे कुंभारबावडी तरुण मंडळ , सुयोग तरुण मंडळ , उत्सव संवर्धक मंडळ , श्री शिव तरुण मंडळ , नवमहाराष्ट्र युवक मंडळ , नवयुग तरुण मंडळ , श्री राजेश्वर तरुण मंडळ , कुंभारबावडी स्थायिक सेवा मंडळ , धोबीघाट मित्र मंडळ , श्री शिवाजी मित्र मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती .
कुरेशी मस्जिद येथे विघ्नहर्ता न्यासच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात विसर्जन मिरवणुकीचे परिक्षण शाम सहानी , इसाक जाफर , वाहिद बियाबानी , सुनिल शिंदे , प्रकाश अरगडे , अनिता जंगम व मोना राठोड यांनी केले . भीमज्योत मंडळाने सोलापूर बाजारजवळील कालव्यावर काम करणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जीवरक्षकांना अल्पोपहार व्यवस्था केली होती . हि व्यवस्था भीमज्योत मंडळाचे अध्यक्ष नितीन आडसुळे , उपाध्यक्ष आनंद शितोळे , मनोहर परदेशी , श्रेयस काळे , नरेंद्र चव्हाण , दीपक अरगडे , मंगल वाल्मिकी व देविदास कापडिया या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले . सेंटर स्ट्रीटवरील विसर्जन मार्गावर जमेतुल कुरेशी वर्किंग कमिटीच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे स्वागत कमिटीचे अध्यक्ष हसन कुरेशी यांनी शाल व पुष्पगुछ देउन केले . तसेच , रिपब्लिकन सोशल पार्टीचे अध्यक्ष विशाल रेड्डी यांनी पाण्याच्या बाटल्याचे वाटप केले . अखिल नेपियर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गुलाल विरहित विसर्जन मिरवणूक काढली . पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ८० युवक युवतींनी विसर्जन मिरवणुकीचे व्यवस्थित पार पाडण्याकरिता पोलिसांना सहकार्य करून विशेष परिश्रम घेतले.
डवायर लेनमधील अशोक चक्र मंडळाने विसर्जन मिरवणुकीचा खर्च केरळ पूरग्रस्तांना मदत करून जागेवर विसर्जन केले . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ व विनय भगत यांनी दिली . तसेच श्री दत्त समाज तरुण मंडळ व श्रीकृष्ण तरुण मंडळ, शिवराम तरुण मंडळाने जाग्यावर विसर्जन केले .




