Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

युग फाऊंडेशनच्यावतीने गणेश उत्सवामध्ये जनजागरुकता अभियान

Date:

पुणे-युग फाऊंडेशनच्यावतीने यंदाच्या गणेश उत्सवामध्ये पर्यावरण जनजागृती , प्लास्टिक बंदी, महिलावरील होणारे अत्याचार  या विषयांवर जनजागरुकता अभियानास सुरुवात  करण्यात आली . पुण्यातील मानाचा गणपती कसबा गणपतीपासून  या अभियानास सुरुवात करण्यात आली . यावेळी युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे हे जनजागृकता अभियानास प्रबोधन केले . त्यानंतर भाऊसाहेब रंगारी व तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये पथनाट्य सादर करण्यात आली .

युग फाऊंडेशन, ही  नोंदणीकृत एनजीओ आहे . पुण्यामध्ये दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात  सर्वत्र  उत्साह असतो त्यासाठी पर्यावरण जनजागृती , प्लास्टिक बंदी जनजागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे .  महिला सशक्तीकरण , महिलांवरील होणारे अत्याचार , महिलांच्या आरोग्यावरील जागरुकता , गणेशोत्सवामध्ये होणारे जल प्रदुर्षण व त्यावरील उपाय आदीं वर पथनाट्य सादर करून जनजागरुकता अभियान राबविण्यात आले . अशी माहिती युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण यांनी दिली .

यावेळी युग फाऊंडेशन कार्यकर्ते  कुणाल जेधे , ऍड. राहुल बालगोहरे , प्रतीक्षा चरण , ऍड. मयूर चव्हाण , विकास कसोटे , आरती पंडकर ,  गोपी कसोटे , कैज होडीवाला , दुशत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .  सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी पंकज पाटील , प्रणव म्हस्के , शिवानी नवले व मनिषा आवटी या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे संचलन केले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...