पुणे-जांभुळकर व केदारी कावड ट्रस्ट आणि समस्त वानवडी ग्रामस्थांच्यावतीने जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बाबुराव जांभुळकर यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला .
वानवडीमधील जांभुळकर गार्डनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वानवडी गाव देवस्थान ट्रस्टचे सरपंच दत्तात्रय लक्ष्मण जांभुळकर , माजी नगरसवेक शिवाजीराव केदारी , जनसेवा बँकेचे माजी अध्यक्ष रघुनाथ कचरे , अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर , श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर ,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र जांभुळकर , नगरसेवक प्रशांत जगताप , नगरसेविका कालिंदा पुंडे , जांभुळकर गार्डनचे संचालक शंभूसेठ जांभुळकर , गणेश जांभुळकर , मारुती जांभुळकर , मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिनेश होले , निवृत्ती गवळी , जीवन जाधव , सुनील सातव आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमानिमित्त पोलिस निरीक्षक व प्रसिध्द किर्तनकार ह. भ. प. रमेश वेठेकर यांचे किर्तन झाले . या कार्यक्रमाचे आयोजन सुदाम जांभुळकर , दीपक केदारी , शिवराम जांभुळकर , बापूसाहेब जांभुळकर , दिलीप जांभुळकर , प्रफुल्ल जांभुळकर , राजाभाऊ केदारी ,आदर्श केदारी ,साहेबराव जांभुळकर , संतोष जांभुळकर , महेश जांभुळकर , मारुती जांभुळकर , संदीप जांभुळकर आदींनी विशेष परिश्रम घेतले .
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले कि , वानवडी येथून तळेगाव दाभाडे येथे जाऊन आपला सामाजिक कार्याचा ठसा जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बाबुराव जांभुळकर यांनी उमटविला , तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदावर काम केले . हे सर्व कार्य पाहता आम्हा वानवडी ग्रामस्थांना आपला अभिमान आहे . आपला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले . त्यामुळे आपला आज जांभुळकर व केदारी कावड ट्रस्ट आणि समस्त वानवडी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला . हा आपला घरचा सत्कार आहे.
यावेळी माजी नगरसेवक शिवाजीराव केदारी यांनी सांगितले कि , राष्ट्रपती व वानवडी गावाचे अतूट नाते आहे . वानवडी गावामधील अपंग कल्याणकारी संस्थेस राष्ट्रपतीपदावर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम असताना त्यांनी भेट दिली आहे . तसेच या संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने संस्थेस सन्मानित करण्यात आले . त्यानंतर आदर्श कर्मचारी म्हणून सोपानराव रासकर यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . आता जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बाबुराव जांभुळकर यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
यावेळी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी सांगितले कि , जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बाबुराव जांभुळकर यांनी केलेल्या कार्यातून आपण सर्वानी प्रेरणा घेतली पाहिजे . त्या प्ररेणेने काम करून यशाची शिखरे गाठली पाहिजेत . तर आपण जीवनात यशस्वी होऊ .
यावेळी जनसेवा बँकेचे माजी अध्यक्ष रघुनाथ कचरे यांनी सांगितले कि , जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बाबुराव जांभुळकर यांनी निस्वार्थ भावनेने काम केले .निस्वार्थ सेवेचा गौरव असून देशभक्तीच्या भावनेतून केलेला सन्मान आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मी आणि त्यांनी एकत्रित काम केले .
यावेळी सत्कारमूर्ती जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बाबुराव जांभुळकर यांनी सांगितले कि , दादर नगर हवेली येथे पोर्तुगीजांचे राज्य होते . त्यावेळी पोर्तुगीज भारतीयांचा अमानुष छळ करीत होते . त्यावेळी आम्हाला पोतुगीजांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून तयार करण्यात आले . त्यावेळी आम्ही पोतुगीजांच्या तळावर हल्ला चढवून तेथील त्याचा ध्वज खाली उतरवून भारताचा ध्वज चढविला . तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आमच्या या कामगिरीचे कौतुक केले . त्यानंतर तळेगाव दाभाडे येथे सामाजिक कार्य सुरु केले . तळेगाव दाभाडे नगराध्यपदी काम केले . पुढे सामाजिक कार्याचा वसा चालविला . आपल्या सामाजिक कार्यात सातत्य ठेवल्यामुळे आपल्याला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत सन्मित्र सहकारी बँकेचे संचालक सुदाम जांभुळकर यांनी केले तर सूत्रसंचालन हरिदास खेसे यांनी केले तर आभार एकता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल जांभुळकर यांनी मानले .

