राम कदम यांचा निषेध करण्यासाठी “ जोडे मारो आंदोलन “

Date:

पुणे-सीख समाज पुणे शहराच्यावतीने  आमदार राम कदम यांचा निषेध करण्यासाठी क्वार्टर गेटचौकात राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले . राम कदम हाय हाय  … राम कदम दो जुते मारो … अशा घोषणा शीख समाजबांधवांनी दिल्या . राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले .

    या आंदोलनात भोलासिंग अरोरा , रणजितसिंग अरोरा , हरपालसिंग राजपाल , देवेंद्र चावला , परमजितसिंग सलुजा , सुरेंद्रसिंग गुरुदत्ता , सुखमीतकौर अरोरा , निलोफर मुल्ला , गुरुविंदरसिंग राजपाल , फतेहसिंग व्होरा , इंदरजितसिंग टूटेजा , हरजितसिंग अरोरा , हरपीतसिंग सूरी , नईमबाबा शेख , अयुब खान , सनमितसिंग गुरुदत्ता व कुलदीपसिंग टूटेजा आदी मान्यवर व शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

     यावेळी भोलासिंग अरोरा यांनी सांगितले कि , आमदार राम कदम यांनी  मुलींबाबत केलेले विधान माता-भगिनींचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे . अन्यथा राम कदम यांना काळे फासण्याचा इशारा शीख समाजबांधवांनी दिला आहे . अफगाणिस्थान सीमेपासून कन्याकुमारीपर्यंत महिलांवर झालेल्या अत्याचाराविरुध्द शीख बांधवानी आपली कुर्बानी देऊन महिलांना संरक्षण दिले . हा  इतिहास लक्षात घेऊन महिलांची सुरक्षा घेण्यात पुढाकार घेतला आहे .

    यावेळी  रणजितसिंग अरोरा यांनी सांगितले कि , मानवी हक्कांवर अन्याय होत असेल तर शीख समाज अन्यायाविरोधात आवाज उठवेल . महिला भगिनींच्या पाठीशी उभे राहील . राम कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर कारवाई करावी . त्यामुळे भविष्यकाळात असे बेताल वक्तव्य कुणी करणार नाही . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...