पुणे–
रक्षाबंधनानिमित्त पुणे रॉयल ग्रुप व लीलाबाई कपूरचंदजी राठोड चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पुणे शहरामधील विविध सामाजिक संस्थांना नॅपकिन्स , सतरंज्या , राख्या व मिठाई भेट देण्यात आली . शहरामध्ये अनेक सामाजिक संस्थामध्ये जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता होती त्यानिमित्त रक्षाबंधन सणाचे औचित्यसाधून हि मदत करण्यात आली अशी माहिती पुणे रॉयल ग्रुपचे संस्थापक नितीन जैन यांनी दिली .
यावेळी विमल संघवी , नितीन जैन , संतोष राठोड , तुषांत राठोड , हिराचंद राठोड , महावीर पारेख , संतोष परमार , राजू नाणेचा , हितेश जैन , नरेंद्र ओसवाल , जीवन शहा , कल्पेश जैन , सुनिल जैन , बाळा ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी विमल संघवी यांनी सांगितले कि, आजच्या पवित्र रक्षाबंधन या सणानिमित्त पुणे शहरामधील सामाजिक संस्थांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत , जेणे करून हा सणाचा आनंद सर्वाना मिळावा . आणि आम्हा सर्वांचे पुण्य एकत्र बांधले जावे . पुणे रॉयल ग्रुपची स्थापना आजच्या जगात एकमेकांना शहरामधील विविध भागातील १०७ परिवारास एकत्र करून स्थापना करण्यात आली . या माध्यमातून स्नेहसंमेलन, समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात .

