पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पुणे शहर सचिवपदी गुरुदेवसिंग रामगडिया यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे पुणे शहर अध्यक्ष नदीम मुजावर यांनी दिले .
गुरुदेवसिंग रामगडिया हे सिख यंग सर्कलच्या सचिवपदी , अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी कार्यरत आहेत . पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पुणे शहर सचिव पदाच्या माध्यमातून जनतेचे समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले .


