पुणे – येथील महात्मा फुले मंडळाच्या वतीने एस्.एस्.सी. विद्यार्थी गुण-गौरव समारंभ, कार्यक्रम सावतामाळी भवन, येथे संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर उल्हासनाना ढोलेपाटील, माजी आमदार कमलनानी ढोलेपाटील, नगरसेविका प्रियाताई गदादे, सामाजिक कार्यकर्त्यां जयश्रीताई झगडे आणि प्रमुख वक्त्या म्हणून मीनाक्षीताई राऊत उपस्थित होत्या. मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकरराव राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. भगवानराव डोके यांनी केले. याप्रसंगी ९२ विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देण्यात आले. याप्रसंगी विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व सर्व सभासद मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत सुदाम टिळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास काठे यांनी केले. शेवटी अध्यक्षीय भाषण मा. मधुकरराव राऊत यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्वांनी सहकार्य केले
महात्मा फुले मंडळाच्या वतीने एस्.एस्.सी. विद्यार्थी गुण-गौरव समारंभ
Date:

