Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

साईबाबांच्या पालखीचे प्रस्थान

Date:

 पुणे-रांगोळी व फुलांचा गालिचा , साईनामाचा गजर ,शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या जयघोषात  हजारो साईबाबांच्या उपस्थितीत साईबाबांच्या पालखीचे प्रस्थान श्री कसबा गणपती येथून श्री क्षेत्र शिर्डीकडे गुरु पौर्णिमेनिमित्त ठेवले . सकाळपासूनच साई भक्तानी कसबा गणपतीपासूनच पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती .

       शिवाजीनगर येथील रासने चाळीतील साईमंदिरात सकाळी साईबाबाच्या पादुकांना मंगल स्नान , अभिषेक इशा अग्रवाल व केशव कैलास अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आले .

     नाशिक येथील श्री त्र्यंबकेश्वर  येथील श्री पीर बालयोगी श्री गणेशनाथजी महाराज यांच्याहस्ते पालखीचे प्रस्थान झाले . यावेळी श्री साईबाबा संस्थांनचे विश्वस्त  उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम , विश्वस्त बिपिनदादा कोल्हे,शिर्डीचे साई कथाकार ह. भ. प. विकास महाराज गायकवाड ,  महापालिका गटनेते श्रीनाथ भिमाले , माजी आमदार प्रकाश देवळे , नगरसेवक रविंद्र धंगेकर , माजी नगरसेविका सुशीला नेटके , सहधर्मादाय आयुक्त दिलीप  देशमुख  , चेन्नई येथील श्री शिर्डी साईबाबा ट्रस्टचे के. व्ही रमणी , कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख , गणेश घुले आदी मान्यवर उपस्थित होते .

         यंदाच्या वर्षीचे पालखीचे ३० वे वर्ष होते . तर साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष सुरु आहे हे या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे वैशिष्ट आहे . यावेळी श्रीनाथ भिमाले यांनी समितीला पन्नास हजार रुपयाचा देणगीचा धनादेश दिला . भाऊसाहेब पगडे परिवारातर्फे साईबाबांना चांदीच्या अब्दागिऱ्या व छत्री  अर्पण करण्यात आल्या .

या कार्यक्रमात श्री पीर बालयोगी श्री गणेशनाथजी महाराज यांच्याहस्ते समितीचे  ” गुरुपाठाचे अभंग ”  श्री गोकुळ राहुरकर व सदाशिव नलावडे यांनी गायलेले आहेत , त्या ध्वनी चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले . व  ” श्री साई सत्यनारायण  ” या ग्रंथाचे प्रकाशन देखील त्यांच्याहस्ते करण्यात आले .

          हि पालखी कसबा गणपती ,  फडके हौद , दारूवाला पूल , रास्ते वाडा , नरपतगीर चौक , पुणे स्टेशन , अलंकार टॉकीज,   नगर रोड मार्गे श्री क्षेत्र शिर्डी येथे २५ जुलै रोजी पोहोचेल दरम्यान  पालखी मार्गावर समितीतर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे .  बंडगार्डन बागेत मध्यान्ह आरती चंद्रसेन निंबाळकर परिवार व   माजी नगरसेवक बाबू वागस्कर व वनिता वागस्कर यांच्याहस्ते करण्यात आली .

        या प्रसंगी श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष शाम वीर , कार्याध्यक्ष गुरुप्रसाद पगडे , सचिव महावीर क्षीरसागर ,खजिनदार विजय मेथे , सहसचिव संजय खरोटे , सहखजिनदार गोकुळ राहुरकर , विश्वस्त मंदार शहाणे , किरण कदम , रमेश भोसले , देविदास फडतरे आदींनी पालखी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले .

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मेथे , प्रास्तविक मंदार शहाणे यांनी केले तर आभार शाम वीर यांनी मानले ..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय...

चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त-सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या...

सरकारने विमान प्रवासाचे भाडे केले निश्चित

५०० किमी पर्यंत ७,५०० रुपये /५००-१००० किमीसाठी कमाल भाडे...