पुणे कँम्पःहिंद तरुण मंडळातर्फे घरातील जेष्ठांच्या स्मृती वृक्षारोपण करुन जतन करण्याच्या अभियानास आज प्रारंभ करण्यात आला. केदारी रस्त्यावरील जैन मंदिराजवळ मंडळाच्या जेष्ठ सदस्या स्व.अंजनीबाई रत्नाकर भोज यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारीजाताच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक दिलीप गिरमकर, संदीप भोसले,महेंद्र भोज,इश्वर मांजरेकर, माधुरी गिरमकर, गणेश भोज,विकास भांबुरे, दीपक कु-हाडे,राजू भगत,जयेश भोज,अतिश कु-हाडे,बलदेव ठाकूर,सौरभ परदेशी, अमोल भोज आदी उपस्थित होते.
प्रत्येकाने आपल्या घरातील दिवंगत जेष्ठांच्या स्मृती वृक्षारोपणाच्या माध्यमातून जतन केल्यास पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल व जेष्ठांच्या स्मृतीही जपता येतील असे मत यावेळी नगरसेवक दिलीप गिरमकर यांनी व्यक्त केले.
विकास भांबुरे यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश भोज यांनी आभार व्यक्त केले.

