ससून सर्वोपचार रुग्णालयात बालरोग रुग्णालयात अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणा व्हेंटिलेटर मशीन आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून भेट देण्यात आले . सुमारे बारा लाख रुपयांचे हे व्हेंटिलेटर मशीन आहे .
ससून सर्वोपचार रुग्णालया हे संदर्भीय रुग्णालय असल्यामुळे व्हेंटिलेटर मशीनची नितांत आवश्यकता होती सध्या स्वाइन फ्ल्यू , न्यूमोनिया , डेंग्यू रुग्णाची संख्या वाढल्यामुळे या यंत्राची आवश्यकता होती .त्यामुळे आमदार अंनतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीमधून हे व्हेंटिलेटर मशीन बसविण्यात आले .
यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले , वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे , बालरोग विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर , डॉ. शिल्पा नाईक , डॉ. राजेश कुलकर्णी , डॉ. छाया वळवी , डॉ. उदय राजपूत, डॉ. रिमा नागपाल , डॉ. हरीश टाटिया , डॉ . इब्राहिम अन्सारी , डॉ. उषा निकुंभ , डॉ. नितेश अग्रवाल, डॉ. सोमनाथ सलगर आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , शिक्षण व आरोग्य यावर आपण आपल्या आमदार निधीमधून जास्तीत जास्त खर्च करण्यावर भर असतो . त्यासाठी आपण ग्रामीण भागातील तसेच शहरी भागामधील शैक्षणिक संस्थांना संगणक भेट दिले आहेत . ससून रुग्णालयामध्ये यापुढील काळात देखील आपण आपल्या आमदार निधीमधून मदत करणार आहे .ससून रुग्णालयासाठी सुसज्ज्य अशी रुग्णवाहिका देण्याचा आपला प्रयन्त राहील असे आश्वासन त्यांनी दिले .
यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णायाबाबत माहिती दिली .