पुणे-महात्मा फुले मंडळाच्यावतीने हिरकमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे सचिव दिलीप राऊत यांच्याहस्ते करण्यात आले . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव राऊत तर प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , , माजी आमदार कमल ढोलेपाटील , दि सासवड माळी शुगर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे , भवानी पेठ प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका मनिषा संदीप लडकत , महात्मा फुले समता परिषदेचे पुणे महानगर अध्यक्ष प्रितेश गवळी , माजी नगरसेवक संदीप लडकत , युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत , ज्योती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर पैठणकर , रघुनाथ ढोक , दिनेश होले , शिवराम जांभुळकर , चार्टर्ड अकौंटंट बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत महात्मा फुले मंडळाचे संस्थापक सदस्य प्रा. भगवानराव डोके यांनी केले तर सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर व चांगदेव पिंगळे यांनी केले तर आभार मंडळाचे सचिव कैलास काठे यांनी मानले .
या कार्यक्रमाचे संयोजन महात्मा फुले मंडळाचे संस्थापक सदस्य प्रा. भगवानराव डोके , उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर , सचिव कैलास काठे , सहसचिव कमलाकर डोके , हिशोबतपासणीस दिलीप भुजबळ विश्वस्त मंडळ सुधाकर आरू , ऍड. दिगंबर आलाट , दीपक जगताप , चांगदेव पिंगळे , गिरीश झगडे , पांडुरंग गाडेकर आदीनी केले होते . यावेळी मंडळास माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी पंचवीस हजार रुपये देणगी दिली.